‘हे’ रोपटे लावून दर महिन्याला करा 1.20 लाखांची कमाई, जाणून घ्या ‘कसा’ मिळेल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हालाही कमी पैशातून व्यवसाय करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाच्या योजनेबद्धल सांगणार आहोत. तुम्ही या व्यवसायायात सहजपणे लाखो रुपये कमावू शकता. या व्यवसायासाठी आपल्याकडे शेतीबद्धल थोडेसे ज्ञान असले पाहिजे. खरं तर आम्ही लावलेल्या ‘लेमन ग्रास फार्मिंग’ बद्धल बोलत आहोत. पंतप्रधानांनी या फार्मिंगला प्रोत्साहन दिले आहे. लेमन ग्रास ही औषधी वनस्पती आहे. हे औषध कॉस्मेटिक आणि डिटजन्टमध्ये वापरले जाते.

आजच्या काळात तुम्हीही ही शेती करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. अशाप्रकारची शेती करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खताची आवश्यकता नाही. या गवताचे जंगली प्राणी नाश करतील अशी भीतीही नाही.

केव्हा करू शकता अशी शेती ?
ही शेती करण्यासाठी सर्वात चांगला महिना म्हणजे फेब्रुवारी ते जुलै. एकदा लावल्यावर ६ ते ७ वेळा हे गवत कापण्यासाठी येते. लेमन ग्रास लावल्यानंतर ३ ते ५ महिन्यांनी याची पहिली कापणी येते.

यातून किती कमाई होते ?
लेमन ग्रासचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. जर तुम्ही एका जमिनीमध्ये याची शेती केली तर तुम्हाला ३ ते ५ लिटर तेल मिळू शकेल. या गवताच्या एका लिटर तेलाची किंमत सुमारे १००० ते १५०० रुपयांपर्यंत आहे.

याची शेती तयार झाली आहे की नाही हे कसे जाणून घ्याल ?
हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला याला तोडून याचा वास घ्यावा लागेल. याला लिंबासारखा वास येत असेल तर समजा हे कापण्यासाठी योग्य आहे.

कापणी कुठपर्यंत करावी ?
जमिनीपासून साधारणतः ५ ते ८ इंच वर कापावे. दुसऱ्या हंगामात १.५ ते २ लिटर तेल येईल. तीन वर्षांपर्यंत याची उत्पादन क्षमता वाढते.

किती खर्च येईल ?
ही शेती करण्यासाठी सुमारे ३० ते ४० हजार रुपये खर्च येईल. याशिवाय त्याचे गाळप हे मेंथा आणि खस प्रामणे केली जाते. जर आपण तीन वेळा कापणी केली तर त्यापासून १०० ते १५० लिटर तेल मिळू शकते.

किती पैसे कमवू शकता ?
वर्षांतून १ लाख ते दीड लाख या गवतापासून कमाई होऊ शकते. खर्च वजा केल्यानंतर वर्षभर तुम्ही ७० हजार ते १.२ लाख रुपयांचा नफा कमावू शकता.