Earphone Burst | जुन्या गॅझेट्सचा वापर करत असाल तर रहा सावध, गाणे ऐकताना कानात फुटला ईयरफोन, तरूणाचा मृत्यू

जयपुर : वृत्तसंस्था –  Earphone Burst | गॅझेट्स काही कालावधीनंतर किती धोकादायक होऊ शकतात, याचा अंदाज जुन्या गॅझेट्सचा वापर करणार्‍यांना क्वचितच असेल. हे अनेकदा जीवघेणे सुद्धा ठरू शकते. राजस्थानच्या जयपुरमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे ईयरफोनच्या आवाजाने तरूणाचा जीव गेला. हा तरूण जुना ईयरफोन (Earphone Burst) आणि कम्प्युटरचा वापर करत होता.

ही घटना जयपुरच्या सीकर हाय-वेवरील उदयपुरिया गावात घडली आहे.
या तरूणाचे वय 28 वर्ष होते. अचानक आवाज वाढला आणि ईयरफोन फाटला ज्यामुळे तरूणाच्या कानातून रक्त येऊ लागले.
यानंतर ताबडतोब त्यास रूग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

आणि फाटला ईयरफोनचा स्पीकर

डॉक्टरांचे म्हणणे आहे की ईयरफोन फाटल्याने झालेल्या मोठ्या आवाजामुळे तरूणाला कार्डियक अरेस्ट आला असेल, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
या तरूणाचा विवाह याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाला होता आणि तो अभ्यासासाठी नेहमी कम्प्युटरचा वापर करत होता.
शुक्रवारी दुपारी सुद्धा तो आपल्या घरात ईयरफोन कम्प्युटरला लावून गाणे ऐकत होता.
जेव्हा अचानक ईयरफोनाचा स्पीकर फाटला आणि त्याचा मृत्यू झाला.

घटनेच्यावेळी तो खोलीत एकटाच होता. आई, बहिण आणि कुटुंबातील इतर सदस्य जवळच्या शेतात काम करत होते. ईयरफोन फाटल्याचा आवाज ऐकून सर्वजण धावत आले.
दरम्यान, मृत तरूणाचे पोस्टमार्टम करण्यात आले नाही.
आणि यामुळे पोलिसांनी सुद्धा केस दाखल केली नाही.

 

Web Title : Earphone Burst | rajasthan jaipur man died as earphone burst while listening song

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी हे ठोस कारण – उच्च न्यायालय

Aspergillus | रिकव्हर झालेल्या कोरोना रूग्णांच्या ‘ब्रेन’मध्ये आढळली भयानक ‘व्हाईट फंगस’ची गाठ, शास्त्रज्ञ झाले हैराण

Pune Crime | शिक्षकेच्या पती अन् त्याच्या मैत्रिणीकडून फेसबुकवर अश्लील व घाणेरडया पोस्ट, महिलेनं उचललं मोठं पाऊल