शिर्डीतून खा. सदाशिव लोखंडे 75 हजारांनी आघाडीवर

आ. कांबळे पिछाडीवर: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना धक्का

ADV

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे हे सातव्या फेरीअखेर तब्बल 75 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मोठी ताकद लावली जात होती. त्यांची पिछाडी थोरात यांना मोठा धक्का मानला जात आहे. लोखंडे यांच्या प्रचारात विखेंची यंत्रणा होती.

सातव्या फेरीअखेर लोखंडे यांना 2 लाख 39 हजार 175 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार कांबळे यांना 1 लाख 64 हजार 808 मते मिळाली. खा. लोखंडे हे तब्बल 75 हजार मतांनी पुढे आहेत. याच मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे रिंगणात होते. मात्र ते विशेष प्रभाव दाखवू शकले नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.

ADV

महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे यंत्रणा होती. तर कांबळे यांच्या बाजूने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात होते. लोखंडे यांच्या आघाडीमुळे थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी महिन्याभरातच पदाचा राजीनामा देऊन महायुतीच्या उमेदवारांना साथ दिली होती. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात काँग्रेस चांगलीच एकाकी पडली होती.

सातव्या फेरीअखेरच्या निकालानंतर विखे समर्थकांनी शिर्डीत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे थोरात गट अस्वस्थ झाला आहे. शिर्डीची निवडणूक उमेदवार खासदार लोखंडे यांच्याविरोधात आ. कांबळे यांच्यापेक्षा विखे-थोरात यांच्यासाठी अधिक प्रतिष्ठेची होती.