ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे : ED Raid in Pune – Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Mushrif) यांच्याशी संबंधित ९ ठिकाणी आज सकाळपासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) (ED Raid in Pune – Hasan Mushrif) पथकाने छापेमारी सुरु केली आहे.

ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड (BRICS Company Director Chandrakant Gaikwad), विवेक गव्हाणे (Vivek Gavane) आणि जयेश दुधेडिया (Jayesh Dudhedia) या व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थान येथे एकाचवेळी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मोठा फौजफाटा आणण्यात आला आहे.

पुणे शहरातील सॅलसबरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण ९ ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या व्यावसायिकांशी मुश्रीफ (Hasan Mushrif Money Laundering Case) यांचे कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.
त्यासंबंधी काही कागदपत्रे मिळतात का याची तपासणी करण्यासाठी ही छापेमारी करण्यात येत असल्याचे समजते.
चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी व निवासस्थानी यापूर्वी जानेवारीमध्येही ईडीने छापे टाकले होते.

हसन मुश्रीफ यांची सीबीआय (CBI), ईडीकडून वारंवार चौकशी केली जात आहे.
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने (High Court) हसन मुश्रीफ यांना अटक करण्यापासून दिलासा दिला आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory)
शेअर्स फसवणुकप्रकरणी (Shares Cheating Case) आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत १०८ जणांनी
तक्रारी केल्या आहेत.

 

Web Title :- ED Raid in Pune – Hasan Mushrif | ED raids 9 places in Pune related to former minister Hasan Mushrif

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MVA Vajramuth Sabha | ‘मविआ’च्या सभेला ‘हा’ बडा नेता राहणार गैरहजर, कारणही आलं समोर

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’