MVA Vajramuth Sabha | ‘मविआ’च्या सभेला ‘हा’ बडा नेता राहणार गैरहजर, कारणही आलं समोर

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या सभेला ‘वज्रमूठ’ असे (MVA Vajramuth Sabha) नाव देण्यात आले आहे. मविआच्या या सभेची जय्यत तयारी झाली आहे. या सभेकडे (MVA Vajramuth Sabha) राज्याचं लक्ष लागलं आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray Party Chief Uddhav Thackeray), विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

महाविकास आघाडीची महत्त्वाची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha) असताना मित्रपक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र या सभेला हजर राहणार नाहीत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकृती अस्वस्थ असल्याने सभेला उपस्थित राहणार नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

 

काय म्हणाले नाना पटोले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही भाजपविरोधात (BJP) सभा घेत आहोत. तीनही पक्षाची भूमिका हीच आहे की, भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे.
आमचे विचार जरी वेगळे असले तरी भूमिका एकच आहे.
ते सावरकर स्मारक बांधणार असतील तर काही फरक पडत नाही.
आम्ही पुढच्या महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj),
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj), ज्योतिबा फुले (Jyotiba Phule)
यांच्या सन्मानार्थ यात्रा काढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

 

 

 

Web Title :  MVA Vajramuth Sabha | congress leader nana patole will be absent from mva rally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा