Edelgive Hurun India Philanthropy | यंदा विप्रोच्या अजीम प्रेमजींनी केलं दररोज 27 कोटीचं दान; जाणून घ्या भारतातील टॉपचे 5 दानशूर व्यक्ती कोण?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलॅन्थ्रॉपी लिस्ट २०२१ (Edelgive Hurun India Philanthropy) नुसार सेवाभावी कार्य करणाऱ्या भारतीयांमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी (Azim Premji, founder of Wipro) यांनी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अझीम प्रेमजी यांनी गेल्या वर्षी म्हणजे २०२०-२१ या आर्थिक वर्षात ९ हजार ७१३ कोटींचे दोन केले आहे. म्हणजेच दररोज २७ कोटी दान केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना महामारीच्या काळात देणग्यांमध्ये एक चतुर्थांश वाढ (Edelgive Hurun India Philanthropy) केली आहे. त्यांच्या पाठोपाठ एचसीएलचे शिव नाडर (hcl shiv nadar) यांचा क्रमांक लागत असून त्यांनी विविध कामांसाठी एक हजार २६३ कोटींची देणगी दिली आहे.

 

एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलॅन्थ्रॉपी लिस्ट २०२१ च्या (Edelgive Hurun India Philanthropy) या यादीत तिसऱ्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)
लिमिडेटचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) असून त्यांनी ५७७ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
तर कुमार मंगलम बिर्ला (kumar mangalam birla) ३७७ कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहेत.
दरम्यान, देशातील सर्वांत श्रीमंत असणारे अदानी समूहाचे (adani group) प्रमुख गौतम अदानी (gautam adani) हे देणगीरांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.
अदानी यांनी आपत्ती निवारणासाठी १३० कोटींची देणगी दिली आहे.
दुसरीकडे इन्फोसिसचे (infosys) सह-संस्थापक नंदन नीलेकणी (nandan nilekani) अधिक प्रमाणात देणगी देऊन पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १८३ कोटींची देणगी दिली आहे.
या यादीमध्ये पहिल्या दहा देणगीदारांमध्ये हिंदुजा कुटुंब (hinduja family) , बजाज कुटुंब (bajaj family), अनिल अग्रवाल (Anil Agarwal)
आणि बर्मन कुटुंबाचा (Burman family) समावेश आहे.

यासंदर्भात बोलताना हारूण इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि चीफ रिसर्चर अनस हमान जुनैद (anas ahmad junaid) म्हणाले की,
बहुतांश पैसा हा शिक्षण आणि आरोग्य सेवेसारख्या मूलभूत कामांसाठी दिला जात आहे. या यादीमध्ये आणखी काही नवीन नावे जोडली गेली आहेत.
त्यापैकीच एक म्हणजे राकेश झुनजुनवाला (rakesh jhunjhunwala).
झुनजुनवाला हे शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकादारांपैकी एक आहेत.
त्यांनी २०२१ या आर्थिक वर्षत्तत शैक्षणिक कामांसाठी आपल्या एकूण कमाईचा एक चतुर्थांश म्हणजे ५० कोटी रुपये दान केले आहेत.

 

Web Title : Edelgive Hurun India Philanthropy | azim premji donated rs 27 crore daily this year edelgive hurun india philanthropy list 2021 hcl shiv nadar RIL mukesh ambani kumar mangalam birla gautam adani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Diet tips | अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर अतिशय कमी प्रमाणात खा ‘हे’ 10 पदार्थ; जाणून घ्या

Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?

PMC Employees News | बोनस व सानुग्रह अनुदान जमा झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ सुरू