Diet tips | अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर अतिशय कमी प्रमाणात खा ‘हे’ 10 पदार्थ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diet tips | प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण दिर्घकाळ तरूण दिसावे, परंतु वाढत्या वयाची अनेक लक्षणे शरीरावर दिसू लागतात. कधी-कधी ही लक्षणं खुप लवकर दिसू लागतात. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, प्रदुषण, चुकीची जीवनशैली इत्यादी कारणामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते जाणून (Diet tips) घेवूयात…

 

हे आहेत ते 10 पदार्थ

1. मसालेदार जेवण (Spicy meal)
मसालेदार जेवण रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण करते आणि त्यांना दुखापत करते. यामुळे चेहर्‍यावर जांभळ्या रंगाचे चट्टे दिसतात. शरीरात उष्णता वाढते.

 

2. बनावट लोणी (Fake butter)
बनावट लोण्यात ट्रान्स फॅट असल्याने कोलेस्ट्रॉल वाढते आणि शरीरात सूज, हृदयरोग, स्ट्रोकची समस्या होते. यामुळे वृद्धत्व लवकर येते.

 

3. सोडा आणि एनर्जी ड्रिंक (Soda and energy drinks)
सोडा आणि एनर्जी ड्रिंकमुळे ऊतींच्या पेशींचे वय वेगाने वाढते. दात खराब होतात. तोंडात बॅक्टेरिया वाढतात.

 

4. मीठयुक्त पदार्थ (Salty foods)
जास्त मीठ खाल्ल्याने मुत्रपिंडात पाणी भरते. कोणतेही अतिरिक्त पाणी शरीराच्या त्या ठिकाणी जाते जिथे मीठ कमी असते, जसे की चेहरा आणि हात. यामुळे त्वचा निस्तेज होते.

 

5. दारू (Alcohol)
दारूमुळे डिहायड्रेशन होते, आणि त्वचेवर परिणाम होतो. सुरकुत्या पडतात.

6. प्रक्रिया केलेले मांस (Processed meat)
बेकन, सॉसेज, हॅम आणि डेली कट्स सारखे प्रोसेस्ड मीट स्मोक्ड, क्योअर किंवा खारट केले जाते. जेणेकरून ते खराब होऊ नये. यामुळे जास्त धोकादायक होते. यामुळे सूज येते. जी शरीराला आजून-बाहेरून खराब करते.

 

7. बेक्ड मीट (Baked meat)
जास्त प्रमाणात भाजलेल्या मांसामुळे शरीरात सूज निर्माण होऊ शकते. हृदयरोग आणि डायबिटीजचा धोका वाढतो.

 

8. गोड पदार्थ (Sweets)
गोड पदार्थांमुळे डायबिटीज आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

 

9. कॅफीन (Caffeine)
कॅफीनमुळे डिहाड्रेशन होऊ शकते यामुळे शरीरात विषारी घटक वाढल्याने कोरडी त्वचा, सोरायसिस आणि सुरकुत्यांची समस्या होऊ शकते.

 

10. तळलेले खाद्य पदार्थ (Fried foods)
तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने आजारपण वाढते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढते, नसा ब्लॉक होण्याचा धोका वाढतो. (Diet tips)

 

Web Title :- Diet Tips | foods that make you age faster 10 foods that speed up your bodys aging process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?

Pune Crime | इंदापूर पंचायत समितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sabyasachi Mukherjee | मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्रची?, फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या ‘ज्वेलरी’वर युझर्सची टीका