या बकऱ्याचा थाटाच वेगळा, राहतो एसीत खातो पौष्टिक

फरीदाबाद: वृत्तसंस्था

येत्या २२ ऑगस्टच्या बकरी ईदच्या पार्श्ववभूमीवर सर्वात स्पेशल बकरी खरेदी करिता ग्राहकांची रीघ लागली आहे. रविवारी फरिदाबाद येथील बराही तलावाजवळ असलेल्या बाजार देखील फुलला होता. या बाजारात एकापेक्षा एक सरस बकऱ्या विक्री करीता आणण्यात आल्या होत्या. या बाजारात एक खास बकरा आणला गेला होता. त्याची किंमत ऐकाल तर साहजिकच तुमच्या भुवया उंच होतील यात शंका नाही.
[amazon_link asins=’B07B9SMJ19,B06XS2HKJ5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’593231e8-a479-11e8-bc06-5d9e67b6471b’]

दुंबाचा थाटाचं वेगळा

फरिदाबाद येथील बाजारात दुंबा नावाच्या बकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या बकऱ्यासाठी लोकांनी खिशातून अगदी ६५ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी दाखवली, पण दुंबाचा मालक एक लाख २० हजाराच्या खाली यायला तयार नाही. दुंबाची बडदास्तही अगदी ऐशोआरामात ठेवण्यात आली आहे. त्याला खायला डाळी, चणे, दूध दिले जाते. त्याला खास एसी खोलीत ठेवण्यात येते.

दुंबाव्यतिरिक्त या बाजारात हिरा आणि भूरा अशा बकऱ्या देखील आहेत. यांची किंमत ६५ हजार रुपये होती. २२ ऑगस्टला ईद आहे. ईदनिमित्त या बकऱ्यांची विक्री हरयाणाव्यतिरिक्त यूपी आणि राजस्थानात जोरावर आहे. बकरी ईदला कुर्बानी साठी बाजारात एकापेक्षा एक सरस जातीचे बकरे उपलब्ध आहेत. सर्वाधिक कमी किंमतीचा बकरा ८ हजार रुपयांना उपलब्ध आहे. एकेका बकऱ्याचे वजन ५० ते ६० किलोंपर्यंत असते. लोक साधारणपणे ८ ते २० हजार रुपयांपर्यंत किंमतीत बकऱ्यांची खरेदी करतात.