Ekda Kay Zala | ‘एकदा काय झालं!!’ झेपावतोय दक्षिणेकडे..! ‘चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये इंडियन पॅनारॉमा या विभागात निवड

पोलीसनामा ऑनलाइन : Ekda Kay Zala | प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित चित्रपट ‘एकदा काय झालं!!’ ची चेन्नईच्या प्रतिष्ठित ‘चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये निवड झाली आहे. कथा सांगणाऱ्या बाप-लेकाच्या जोडीची एक हळवी गोष्ट या चित्रपटाद्वारे मांडली आहे. चित्रपटाची इंडियन पॅनारॉमा या विभागात निवड झाली आहे. (Ekda Kay Zala)

या चित्रपटात सुमीत राघवन, मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, सुहास जोशी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. संदीप खरे आणि समीर सामंत यांनी सिनेमासाठी गाणी लिहिली असून त्यातलं एक गाणं शंकर महादेवन यांनी गायलं आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ गोवा सोबत मानाच्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप पाडून हा मराठी चित्रपट आता दक्षिणेतल्या लोकांचं मन जिंकायला सज्ज झालाय. (Ekda Kay Zala)

येत्या २० डिसेंबरला दुपारी १ वाजता या चित्रपटाचा शो होणार आहे, असं फेस्टिव्हलच्या प्रदर्शित झालेल्या वेळापत्रकावरून दिसतंय. एक वेगळा विषय मांडून मराठी चित्रपटाची मान उंचावल्याबद्दल या चित्रपटाचे आणि विशेषतः डॉ. सलील कुलकर्णीचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

Web Title :-Ekda Kay Zala | ‘What happened once!!’ Rushing south..! Selected in the Indian Panorama category at the ‘Chennai International Film Festival’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन

Taapsee Pannu | तापसी पन्नू झळकणार शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात; 2023 मध्ये होणार प्रदर्शित

Vivek Oberoi | बॉलिवूडवर अभिनेता विवेक ओबेरॉयने केले मोठे विधान; “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…”