Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी सत्ता आणली पण ते रामराज्य आणू शकले नाहीत – एकनाथ खडसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सत्र न्यायालयाने (Pune Session Court) भोसरी जमीन खरेदी प्रकरणाच्या (Bhosari Land Purchase Case) घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घोटाळ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (NCP Leader) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव जोडले जात आहे. खडसे यांनी मात्र ते आरोप फेटाळले आहेत. यावेळी एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) शिंदे-भाजपवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत. पण ते रामराज्य आणू शकले नाहीत. दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळविला होता. राम रावणाचा वध करुन अयोध्येत पोहोचला होता. एकीकडे श्रीरामाने आज विजय संपादन केला होता. तसेच महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदे यांनी विजय संपादन केला आहे. मात्र श्रीरामाने जे रामराज्य आणले ते आणण्यास एकनाथ शिंदे कमी पडत आहेत. मागील तीन-चार महिन्यात भीषण चित्र तयार झाले आहे. या चार महिन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers Commit Suicide) केल्या आहेत. सर्वच क्षेत्रात महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. शिंदे केवळ आश्वासने देत आहेत. कृती मात्र ते करत नाहीत. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी नाही,
असे खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

तसेच न्यायालयाने भोसरी जमीन प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश दिल्यावर खडसेंनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.
मला राजकीय दृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यासाठी सत्ताधारी पक्षातील (BJP) काही मंत्र्यांकडून भोसरी भूखंड प्रकरणात मला अडकविण्याचा प्रयत्न होत आहे,
असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse criticizes eknath shinde said he is not able to bring ram rajya in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा