Pune Fire News : लक्ष्मी पूजनाला फटाक्यांच्या अतिषबाजीने सहा ठिकाणी आगीच्या घटना, बी टी कवडे रस्त्यावर 8 दुचाकी जळाल्या

पुणे : (Pune Fire News) – शहरात लक्ष्मी पुजनानंतर (Laxmi Pooja) ठिकठिकाणी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने दोन तासात सहा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.  प्रामुख्याने बी टी कवडे रस्त्यावर लागलेल्या आगीत ८ दुचाकी जळल्या आहेत. इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपाची आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती अग्निशमन दलाचे जवान निलेश महाजन यांनी दिली. (Pune Fire News)

दिवाळीनिमित्त आज संध्याकाळी सात ते रात्री नऊ  वाजेपर्यंत आगीच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये जनता वसाहत, गल्ली क्रमांक ४७ येथे झाडाला आग लागली होती.

तर  काञज, आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक गॅलरीसह बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह सोसायटीत लागलेल्या आगीत ८ दुचाकी पेटल्या होत्या. नऱ्हेतील मानाजीनगर , ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग लागली होती.
विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ झाडासह वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग
लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण
मिळवले.

Web Title :- Pune Fire News : Firecrackers on Lakshmi Poojan fire at six places, 8 bikes burnt on BT Kavade road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा