Eknath Khadse | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात ‘तू तू मै मै’

जळगाव: पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यात खडसे आणि महाजन युद्ध सुरु आहे. मागील काही दिवसांत जळगावमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे जळगाव दूध उत्पादन संघात भ्रष्टाचार आणि दुसरी जळगाव बाजार समितीसाठी खडसे यांच्या विरोधात भाजपचा उभा असलेला आमदार. त्यामुळे जळगावात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यात आता खडसेंनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर बोट ठेवले आहे. नियोजन निधीच्या खर्चावरुन एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि महाजन वाद पुन्हा पेटले आहेत.

औषंधांसाठी जिल्हा नियोजन निधी खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला आहे. त्यावरुन गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे खडसेंसोबत वाद सुरु आहेत. आज (दि. 21) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी तीनही नेते बैठकीला उपस्थित होते. सभागृहात अधिकाऱ्यांनी औषधांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी खर्च करण्याबाबत प्रश्न मांडला. यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जिल्हा नियोजन समितीतून औषधांसाठी निधी खर्च करण्याची गरज काय? वैद्यकीय शिक्षण विभागातून औषधांसाठी निधी का वापरले नाहीत? असे प्रश्न उपस्थित केले. प्रश्न उपस्थित करुन खडसेंनी सभागृहातील अधिकारी आणि ग्रामविकास मंत्री मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केले.
यावरुन खडसे आणि महाजन यांच्यात वाद झाले. ‘तुमच्या घरातून पैसे जात नाहीत’, असे महाजनांनी खडसेंना उत्तर दिले.
त्यामुळे त्यांच्यात खडाजंगी सुरु झाली. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मध्यस्थी करत चर्चेतून मार्ग काढता येईल,
असे म्हंटल्याने हा वाद थांबला. पण, थोड्या वेळासाठी सभागृहातील कामकाज आणि वातावरण तणावपूर्ण झाले होते.

त्यामुळे पुन्हा एकदा खडसे आणि महाजन वाद उफाळून आले आहेत. मागील दिवसांत महाजन यांनी
खडसेंवर घराणेशाहीवरुन टीका केली होती. खडसे घराणेशाही करतात, त्यांना सर्व ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील
लोक हवे असतात. सर्व ठिकाणी ते आपल्याच लोकांना चिटकवतात, असे महाजन म्हणाले होते.

Web Title :- Eknath Khadse | jalgaon district planning committee meeting fight between eknath khadse and girish mahajan over planning fund expenditure