Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुण्यात भाऊ, तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना गिरीश बापट (Girish Bapat) यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट मला मोठ्या भावसारखे होते. आता आपला खासदार पुण्यातून दिल्लीला जाणार आहे. पुण्यात भाऊ तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच निवडून येणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात व्यक्त केला.

पुण्यातील बालगंधर्व (Bal Gandharva Ranga Mandir) येथे महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचे वातावरण राज्यभर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ आणि आपले इतर उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत.

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या तीस वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे.
त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली, आणि आता अजित पवार सोबत आले.
आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता असे म्हणणे बंद झाले आहे.
आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे.

मोदींजींच्या कामामुळे आपली महायुती भक्कम होत चालली आहे. संपूर्ण देशात मोदी लाट आहे.
लोकांनी ठरवले आहे की मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे. अब की बार ४५ पार, आपण ४८ पण जाऊ शकतो, असा
विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monika Murlidhar Mohol | प्रचाराच्या रणधुमाळीत मोहोळांच्या ‘होम मिनिस्टर’ देखील आघाडीवर, पहिला टप्पा पूर्ण! मोनिका मोहोळ यांची पतीला खंबीर साथ