Eknath Shinde | महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे – एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन शिवसेनेतील 35-40 आमदारांना घेऊन सूरत गाठले. तेथून त्यांनी गुवाहटी येथे गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांची गुवाहटी येथील हॉटेलमध्ये बैठक सुरु झाली आहे. यापूर्वी शिंदे यांनी ट्विट करुन चार मुद्दे मुद्दे मांडले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, गेल्या अडीच वर्षात म.वि. आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविणासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दरम्यान, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी अचूक ट्विट केले. शिंदे यांचे हे दिवसभरातील तिसरं ट्विट असून, यामध्ये त्यांनी चार मुद्यांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Web Title :- Eknath Shinde | shivsena leader eknath shinde news tweet says now its time to do for maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC | 8 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत मिळवा 50 लाखापेक्षा जास्त रिटर्न, फायद्याचा सौदा आहे LIC चा ‘हा’ प्लान

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून घ्या

 

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले…