Ekta Kapoor Arrest Warrant | सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज प्रकरणी एकता कपूरविरोधात अटक वॉरंट

नवी दिल्ली : छोट्या पडद्यावरील निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor Arrest Warrant) अडचणीत आली आहे. बिहारच्या न्यायालयाने (Bihar Court) एकता कपूर, तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्याविरोधात अटक वॉरंट (Ekta Kapoor Arrest Warrant) जारी केले आहेत. वेब सिरीजमध्ये (Web Series) सैनिकांच्या पत्नीचे पात्र आक्षेपार्ह दाखल्याने हे प्रकरण एकता कपूरला महागात पडणार आहे.

एकता कपूरच्या ट्रिपल एक्स वेबसीरीजच्या सिझन 2 (XXX Webseries Season 2) मध्ये सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह दृश्य दाखविण्यात आले होते. सैन्याचे जवान जेव्हा देशसेवेत असतात तेव्हा त्यांच्या पत्नी घरात परपुरुषांसोबत असतात, असे दाखविण्यात आले आहे. या प्रकरणी 6 जून 2020 ला माजी सैनिक शंभू कुमार (Former Soldier Shambhu Kumar) यांनी सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली होती. बेगुसरायचे न्यायदंडाधिकारी विकास कुमार (Magistrate Vikas Kumar) यांच्या न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे.

एकता कपुरच्या या वेब सिरिजमधील द़ृश्यांवरून माजी सैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
माजी सैनिकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये एकता कपूर आणि शोभा कपूरला
हजर राहून उत्तर देण्याचा समन्स जारी करण्यात आले होते.
एकता कपूरच्या ऑफिसमध्ये हे समन्स पाठविण्यात आले होते.

अधिवक्ता हृषिकेश पाठक (Hrishikesh Pathak) यांनी सांगितले की,
माजी सैनिकांच्या वतीने न्यायालयात तक्रार पत्र दाखल करून आक्षेप घेण्यात आला आहे.
आता न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. 524/सी 2020 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Ekta Kapoor Arrest Warrant | arrest warrant against ekta kapoor action against offensive scenes on soldiers wives shows in xxx web series

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

7th Pay Commission DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे ‘फेस्टिव्हल गिफ्ट’, महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ

BJP On Shivsena | मराठी माणसाचा उत्सव पाहून मळमळतंय…मग घ्या ना धौती योग; शिवसेनेवर भाजपाची टीका

Ashish Shelar | ‘ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!’, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला