अभिनेत्री एली अवरामनं शेअर केला डान्स व्हिडीओ, पाहताच झाला ‘व्हायरल’, लोक म्हणाले- ‘आग लावलीस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार एली अवराम लास्ट टाईम मलंग या सिनेमात खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. अदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी आणि अनिल कपूर स्टारर या सिनेमात एलीच्या बदललेल्या लुकमध्ये तिची हेअर स्टाईलच नाही तर टॅटूही दिसले होते. एलीनं नुकतेच मलंग लुकवालेच काही थ्रोबॅक फोटो सोशलवर शेअर केले होते ज्यामुळं ती चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळं एली चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे.

एली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करायाला तिला खूप आवडतं. अलीकडेची एलीनं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B9T_mP3gvN6/

एलीनं शेअर केलेल्या व्हिडीओत तिचा जबरदस्त डान्स दिसत आहे. आपल्या हॉट मुव्स आणि एनर्जेटीक स्टेप्समुळं एलीनं चाहत्यांचं मन जिंकलं आहे. एलीचा व्हिडीओ सोशलवर व्हायरत होत आहे. व्हिडीओ शेअर करताना एली म्हणते, “तुम्हाला मला आणखी डान्स करताना पहायचं आहे का ?” एलीच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकानं म्हटलं आहे की, तू तर आगच लावलीस.

https://www.instagram.com/p/B9Izu2GgZJq/

एलीचा हा डान्स व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की, एका दिवसात या व्हिडीओ 3 लाख व्ह्युज मिळाले आहेत. एलीच्या हजारो चाहत्यांनी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 आलेल्या मिकी वायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अ‍ॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे. लासट टाईम एली मलंग सिनेमात दिसली. 7 फेब्रुवारी रोजी 2020 हा सिनेमा रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/B8YqRKTAtmB/

https://www.instagram.com/p/B8MKZlng5NV/

https://www.instagram.com/p/B8DW86lgmWa/

https://www.instagram.com/p/B7vUIMHA0TT/