Employment Exchange | खुशखबर ! आता ज्येष्ठ नागरिकांना नोकरी देण्यासाठी मोदी सरकार उचलतंय ‘हे’ मोठं पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Employment Exchange | देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी नोकरी केंद्र (employment exchange For senior
citizens) उघडणार आहे ज्याद्वारे त्यांना नव्याने नोकरी देण्याचा प्रयत्न केला जाईल. हे एक्सचेंज 1 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारपासून सुरू होईल. याशिवाय सरकारने ज्येष्ठांसाठी एका हेल्पलाईनची सुरूवात सुद्धा केली आहे.

या एक्सचेंजमध्ये (Employment Exchange) ज्येष्ठ नागरिक आपले रजिस्ट्रेशन करून रोजगार शोधू शकतात. अशाप्रकारचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज देशात पहिल्यांदा उघडले जात आहे.
यासाठी एक पोर्टल सुरू होत आहे.

काय होईल फायदा

60 वर्षावरील ज्या लोकांना नोकरी करायची आहे ते 1 तारखेपासून सामाजिक न्याय मंत्रालयाच्या (MoSJ&E) नेतृत्वात उघडण्यात येत असलेल्या सिनियर एबल सिटीजन्स फॉर रि-एम्प्लॉयमेंट इन डिग्निटी पोर्टल (Senior Able Citizen for Re-Employment in Dignity Portal) वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, हा एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म असेल.
ज्यावर स्टेकहोल्डर एकमेकांशी व्हर्च्युअली भेटतील आणि रोजगाराच्या संधीविषयी चर्चा करतील मंत्रालयाने CII, Ficci आणि Assocham सारखया इंडस्ट्री चेंबरला सुद्धा पत्र लिहून म्हटले आहे की,
ज्येष्ठ नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करावी.

मंत्रालयाने काय म्हटले

मंत्रालयाने म्हटले की, कंपन्यांच्या मनावर असेल की, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला नोकरीची संधी द्यावी किंवा नाही.
जगण्याच्या वयात वाढ झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या देशात वाढत आहे, अशावेळी हे एक्सचेंज खुप उपयोगी ठरेल.

 

Web Title : Employment Exchange | good news modi government to launch unique employment exchange for senior citizens

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supreme Court | बिल्डरांना सुप्रीम कोर्टाचा दणका ! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार; जाणून घ्या

Manohar Mama Bhosale | अबब ! मनोहरमामा भोसले यांच्या बँक अकाऊंटमध्ये ‘इतके’ लाख रुपये कुठून आले?

Solapur Crime | धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीचीही रेल्वेखाली आत्महत्या; प्रचंड खळबळ