ज्येष्ठ पर्यावरणवादी, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे ‘कोरोना’ने निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण यामध्ये बाधित आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यातच आता प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनाने निधन झाले.

प्रसिद्ध चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 8 मेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना ऋषिकेश एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

हिमालयाचे रक्षक सुंदरलाल बहुगुणा

महात्मा गांधी यांच्या सिद्धांतांवर चालणाऱ्या सुंदरलाल बहुगुणा यांनी 70 च्या दशकात पर्यावरण सुरक्षेच्या मुद्यावरून अभियान सुरु केले होते. ज्याने संपूर्ण देशात व्यापक परिणाम केला. त्यादरम्यान चिपको आंदोलनही याच प्रेरणेने सुरु केले गेलेले अभियान होते. तेव्हा हिमालयात झाडांची कत्तलींना विरोध करण्यासाठी अत्यंत शातीपूर्ण आंदोलन केले गेले. चिपको आंदोलन जगभरात ओळखले जाते. त्याचेच ते प्रणेते होते.