Esmayeel Shroff Passed Away | ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचं निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ (Esmayeel Shroff Passed Away) यांचे काल रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 65 वर्षांचे होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्माईल यांनी ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘बुलंदी’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘सूर्या’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन (Superhit Movie Direction) केलं होतं. ते मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते. (Esmayeel Shroff Passed Away)

इस्माईल श्रॉफ यांना ‘थोडी सी बेवफाई’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna), शबाना आझमी (Shabana Azmi) आणि पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका पार पाडली होती. हा चित्रपट 1980 च्या दशकात प्रचंड गाजला होता. हा चित्रपट इस्माईल यांचा भाऊ मोईनुद्दीन यांनी लिहिला होता. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कुमार (Raj Kumar) यांच्यासोबत चार चित्रपट करणारे इस्माईल हे एकमेव चित्रपट दिग्दर्शक होते. (Esmayeel Shroff Passed Away)

मागच्या काही महिन्यांपासुन होते आजारी दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांना 29 ऑगस्ट रोजी ब्रेन स्ट्रोक
(Brain Stroke) आला होता. ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या उजव्या बाजूला लकवा मारला होता.
त्यामुळे त्यांना चालता-फिरता येत नव्हतं. तेव्हापासून ते झोपून होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांची बुधवारी अचानक प्रकृती खालावली आणि त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

Web Title :-Esmayeel Shroff Passed Away | veteran director esmayeel shroff passes away see latest report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस; सदस्यांनी विचारले प्रश्न, म्हणाल्या – ‘हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन’

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान