गाडीची चावी हरवली तरी आता No Tension, स्मार्टफोनने गाडीला लॉक अन् अनलॉक करता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   तुमच्या गाडीची चावी हरवली असली तरीही आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आयफोन आणि अँड्राइड डिव्हाइसचा वापर करून थेट कारला लॉक आणि अनलॉक करता येणार आहे. तुम्हाला कदाचित हे नवीन वाटू शकते. मात्र अ‍ॅपलच्या आयफोनमध्ये Car Key फीचर येऊन जळपास एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. अ‍ॅपल यूजर गाडी स्टार्ट करणे आणि दरवाजा उघडण्यासाठी आयफोनचा वापर करू शकतात. आता गुगलने आपल्या Google I/O इव्हेंटमध्ये घोषणा केली असून चालू वर्षाच्या शेवटी Car Key फीचर यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

अँड्राइड 12 मध्ये येणारे हे फीचर अँड्राइड स्मार्टफोनला चावीमध्ये बदलणार आहे. सध्या केवळ गुगल पिक्सल आणि सॅमसंग गॅलेक्सी फोनमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. हे फीचर वर्ष 2021 मध्ये काही ठराविक मॉ़डेल आणि बीएमडब्ल्यूसह अन्य कंपन्याच्या मॉडेलमध्ये वर्ष 2022 मध्ये उपलब्ध होणार आहे. डिजिटल कार की फीचर हे Ultra Wideband (UWB) तंत्रज्ञानावर काम करत आहे. हे एक प्रकारचे रेडिओ ट्रांसमिशन तंत्र असून यात सेंसर एका छोट्या रडारप्रमाणे काम करते. सिग्नलची दिशा सांगू शकते. याद्वारे फोनमधील अँटिना आजुबाजूच्या UWB तंत्रज्ञानचा समावेश असलेल्या वस्तूंना लोकेट करून ते ओळखू शकते. या तंत्रज्ञानाद्वारे अँड्राइड यूजर आपल्या कारला लॉक अथवा अनलॉक करू शकतात. तसेच ज्या लोकांकडे केवळ एनएफसी तंत्रज्ञान असलेली कार असेल, ते फोनने केवळ कारच्या दरवाजाला अनलॉक करू शकतील. हे फीचर पूर्णपणे डिजिटल आहे. अशात जर मित्र अथवा नातेवाईकाला कारच्या चावीची आवश्यकता असल्यास Key ला सुरक्षितरित्या रिमोटली शेअर करणे शक्य असल्याचे देखील गुगलने म्हटले आहे.