पालघरमध्ये चक्क खाजगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक

पालघर: पोलीसनामा ऑनलाईन

पालघर लोकसभा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. पालघरमध्ये काल ४६.५0 टक्के मतदान मतदान झाले आणि सातही उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंदिस्त झाले. पालघर मध्ये काळ काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना देखील झालाय होत्या. आता उत्सुकता आहे ती निकालाची . मात्र त्याआधी एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पालघर मधील चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या मतपेट्या होत्या .किराट गावातील काही नागरिकांच्या ही बाबा लक्षात आली आणि त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला .याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान या प्रकरणाची सखोल चोकशी करण्याचे आदेश पालघर चे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. याप्रकरणी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केले की,मतपेट्या वाहून नेण्यासाठी सरकारी वाहने आणि चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता , निवडणूकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तसे सांगितले देखील होते . मात्र त्याला फाटा दिल्याचे आजच्या घटनेने समोर आले आहे.

बूथ क्र.17 चिंचरेमधील या मतपेट्या खाजगी वाहन क्रमांक एम एच 03 ,बीएस 0980 मधून नेल्या जात होत्या.यावेळी सावध असलेल्या नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. आधीच मतदानावेळी अनेक ईव्हीएम बंद पडल्याने, निवडणूक प्रक्रियेवरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यातच असे प्रकार घडल्याने, अनेक संशय व्यक्त केले जात आहेत.