Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Excise Department Pune | पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर (Kalyani Nagar Car Accident Pune) बेकायदेशीर हॉटेल (Illegal Hotels In Pune) , पबवर (Pubs In Pune) प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. कल्याणीनगर अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. पुणे कार्यालयाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अल्पयीन मुलांना मद्य पुरवठा, हॉटेल आवारात मद्य सेवा, विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या 142 हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापैकी 68 हॉटेल, पबचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे.(Excise Department Pune)

उत्पादन शुल्कच्या तपासणीत जर कोणी अल्पवयीन मुलांना मद्य देताना आढळून आल्यास संबंधित हॉटेल, पबचा परवाना रद्द करणार असल्याची माहिती पुणे उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील (Sujit Patil) यांनी दिली आहे.

कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation-PMC), पोलीस (Pune Police), उत्पादन शुल्क या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. पालिकेकडून अनधकिृत पबवर कारवाई करण्यात येत आहे. तर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याप्रकरणी पब चालक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अपघातानंतर पुणेकरांचा व माध्यमांचा दबाव वाढल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, मद्य पिण्याचा परवाना नसणे,
हॉटेल-पब आवारात मद्य सेवा देणे अशा विविध कारणांसाठी 142 हॉटेल, पबवर कारवाई केली. त्यापैकी 68 हॉटेल,
पबचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे
उपअधीक्षक सुजित पाटील यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar – RSS – BJP | संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”

Chhagan Bhujbal | लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 जागांवर परिणाम कसा? भुजबळांचा सवाल

Bhide Wada Smarak | भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलै मध्ये होणार असल्याची अजित पवारांची माहिती