कामगार वर्गासाठी चांगली बातमी : यावर्षी पगारामध्ये होणार ‘भरघोस’ वाढ, यामागे आहे ‘हे’ कारण – सर्वेक्षण

पोलीसनामा ऑनलाईन : मागील वर्षी कामगारवर्गासाठी वाईट होते. बर्‍याच कंपन्या वेतनवाढ तर लांबच पगार देखील वेळेवर देत नव्हत्या. परंतु 2021 वर्ष त्यांच्यासाठी चांगली बातमी आणू शकेल. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कंपन्या कर्मचार्‍यांना मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ देऊ शकतात. या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, जलद आर्थिक सुधार आणि व्यवसाय व सुधारणेची अपेक्षा या काळात कर्मचार्‍यांना यंदा सरासरी 7.3 टक्के वेतनवाढ मिळू शकेल. Deloitte Touche Tohmatsu India LLP (DTTILLP) यांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात म्हटले की, या वर्षीची सरासरी वाढ 2020 मधील 4.4 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, परंतु 2019 ची वेतनवाढ 8.6 टक्क्यांपेक्षा कमी असेल.

या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 92 % कंपन्यांनी म्हटले की यावर्षी ते आपल्या कर्मचार्‍यांना वाढीव रक्कम देतील, तर मागील वर्षी 60 % लोकांनी वेतनवाढ देण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार हे वर्ष कर्मचार्‍यांसाठी खूप चांगले ठरू शकते. डिसेंबर 2020 मध्ये या सर्वेक्षणास सुरुवात झाली आणि त्यात सात क्षेत्र आणि 25 उप-क्षेत्रातील सुमारे 400 कंपन्यांचा समावेश होता.सर्वेनुसार भारतातील वेतनवाढीची सरासरी वाढ 7.3 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, जे 2020 मध्ये 4.4 टक्क्यांहून अधिक आहे. आर्थिक हालचालींमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक सुधारणा, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे आणि चांगले मार्जिन यामुळे कंपन्यांनी वेतनवाढीसाठी अर्थसंकल्प वाढविला आहे.

माहितीनुसार 20 टक्के कंपन्यांनी 2020 मधील केवळ 12 टक्के तुलनेत यंदा दुप्पट आकडी पगाराची योजना आखली आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी पगार न वाढविणाऱ्या कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांनी यावर्षी अधिक वाढ किंवा बोनसच्या स्वरूपात त्याची भरपाई करण्याची तयारी केली आहे.