बाप्पा मेहरबान ! जनशताब्दी एक्स्प्रेस आता ‘सावंतवाडी’ मध्येही ‘स्टॉप’ घेणार

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जनशताब्दी या एक्स्प्रेसला आता सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून घेण्यात आला आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून प्रवासी संघटना यासाठी आग्रही होत्या. त्याचे कारण म्हणजे सावंतवाडी स्थानकावर मंगला, नेत्रावती यांसारख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसना थांबा मिळत नव्हता तो आता मिळणार आहे.

कोकणात चतुर्थीला विशेष महत्व आहे. त्यामुळे चतुर्थी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकं कोकणात जात असतात. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्टपासून दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी स्थानकात दोन मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाप्रमाणे ३० ऑगस्टपासून दादरहून मडगावकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी सावंतवाडी स्थानकात पोहोचेल. तर, मडगावहून दादरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सावंतवाडी स्थानकात प्रस्थान करेल.

तसेच, रेल्वेच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सावंतवाडी स्थानकात येईल. तर, मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सावंतवाडी स्थानकात पोहोचेल.

आरोग्यविषयक वृत्त –