SBI च्या ग्राहकांसाठी अंत्यत महत्वाची बातमी ! ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, Case विड्रॉल करण्यापुर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

पोलीसनामा ऑनलाइन – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने होणाऱ्या अयशस्वी व्यवहारांवर (Unsuccessful Transactions) आता अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे. पुरेशी रक्कम खात्यात शिल्लक नसेल तर त्यासाठी २० रुपये आणि त्यासोबत GST वसूल केला जाणार आहे. बँक नॉन फायनेंशियल ट्राजेंक्शनवरही चार्ज लावणार आहे.

SBI च्या डेबिट कार्डहोल्डर्सना आपल्या ATM व्यवहारांची मर्यादा असायला हवी. ग्राहक जर मर्यदापेक्षा अधिक व्यवहार करत असेल तर त्याकरता अतिरिक्त पैसे आकारण्यात येतील, अधिकच्या व्यवहारांसाठी बँकेकडून १० रुपये ते २० रुपये त्याचसोबत GST शुल्क आकारला जाईल. ग्राहकांना या अतिरिक्त रकमेपासून वाचण्यासाठी ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

SBI आपल्या ग्राहकांना एक महिन्यात सेव्हिंग खातेदारांना ८ वेळा मोफत ही सुविधा देते, त्यातील ५ वेळा SBI एटीएममधून तर ३ वेळा अन्य बँकाच्या ATM मधून आर्थिक व्यवहार ग्राहक करु शकतो. गैर मेट्रो शहरांत १० वेळा पैसे काढणे-भरण्याची सुविधा मोफत आहे. त्यात ५ वेळा SBI मधून तर इतर ५ वेळा दुसऱ्या बँकांच्या ATM मधून पैसे काढण्याची मुभा आहे.

बँकेने ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन १ जानेवारी २०२० पासून OTP आधारित सेवा सुरु केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर त्यासाठी OTP ची गरज भासते. हा OTP ग्राहकाच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकांवर पाठवला जातो, OTP आधारित पैसे काढण्याची सुविधा फक्त SBI च्या एटीएम मध्ये उपलब्ध आहे.