फेसबुकला दणका ! डेटा लीक प्रकरणी ‘एवढया’ हजार कोटींचा दंड

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मागील वर्षी मार्च 2018 मध्ये फेसबुक डेटा लीक विषयी सर्वात मोठं प्रकरण समोर आलं. युजर्सची डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेत फेसबुककडून चूक झाल्याचं आढळून आल्याचं फेडरल ट्रेड कमिशनच्या तपासात आढळून आलं आहे.

केंब्रिज अँनालिटिक डेटा लीक प्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने सोशल मीडिया म्हणून एक लोकप्रिय असलेल्या फेसबुकवर 5 अब्ज डॉलर्सचा (34 हजार कोटी) दंड ठोठावला आहे. एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीला ठोठावलेला आजवरचा हा सर्वाधिक दंड आहे. त्याचबरोबर याआधी 2012 मध्ये गूगलला 22 मिलियन डॉलर्सचा एवढा दंड ठोठवण्यात आला होता.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अमेरिकेची फेडरल ट्रेड कमिशनकडे होती. यानुसार केंब्रिज अँनालिटिक डेटा लीक प्रकरणात फेसबुकच्या युझर्सच्या खाजगी माहितीचा गैरवापर केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार हा दंड ठोठावला आहे.

गतवर्षी मार्च 2018 मध्ये फेसबुक डेटा लीक प्रकरणाचं सर्वात मोठं प्रकरण समोर आलं होतं. युजर्सची डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेत फेसबुककडून चूक झाल्याचं आढळून आल्याचं फेडरल ट्रेड कमिशनच्या तपासात आढळून आलं. मात्र फेडरल ट्रेड कमिशन आणि फेसबुकने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

ही कारवाही झाली तरी याचा फेसबुकवर फारसा फरक पडेल असं वाटत नाही. कारण फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना या कारवाईची पूर्वकल्पना होती. त्यानुसार त्यांनी 3 अब्ज डॉलर एवढी रक्कम आधीच जमवली होती. याशिवाय यावर्षी पहिल्या तीन महिन्यात फेसबूकने 15 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. त्यामुळे दंडाची रक्कम फेसबुकच्या कमाईच्या तुलनेत कमी आहे.

आहे काय फेसबुक डेटा लीक प्रकरण ?

2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या ‘केम्ब्रिज अँनालिटिक’ या कंपनीने जवळपास 8 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे.

ब्रिटनमधील केम्ब्रिज अँनालिटिक कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी ‘फेसबुक इंक’कडे याविषयी उत्तर मागितले होते.

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या