IPL 2021 उर्वरित सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्येच, ECB चं परिपत्रक व्हायरल?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Indian Premier League 2021 कोरोनामुळे स्थगित केल्या आहेत. परंतु, राहिलेले IPL सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याबाबत BCCI प्रयत्शील आहे. सप्टेंबरपर्यंत इंडियन टीम आता इंग्लंड दौऱ्यावर आहेत. यावरून राहिलेले IPL चे ३१ सामने इंग्लंडमध्येच खेळवण्याच्या हालचाली BCCI करत आहे. म्हणून BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे चर्चेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. तसेच आज (शुक्रवारी) इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) नावाने एक स्टेटमेंट समाज माध्यमावर प्रसारित झालं आहे. तर त्यामध्ये IPL चे बाकी सामने खेळण्यास त्यांचे आयोजन करण्यास ईसीबी तयार असल्याचा त्यात उल्लेख आहे.

BCCI चेअध्यक्ष सौरव गांगुली यांनी अंदाज व्यक्त केलाय की, IPL २०२१ उर्वरित सामने न झाल्यास BCCI ला साधारण २ हजार ५०० कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी BCCI लंडन व UAE या २ देशामध्ये IPL बाकी सामने खेळवण्याचा विचार करतेय. यावरून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची विनंती BCCI ने ECB कडे केल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करून पुन्हा त्यांनी डिलीट केले आहे. दरम्यान, भारत-इंग्लंड कसोटी मालिका जुलैमध्ये सुरू करण्याची विनंती BCCI ने ECB कडे केली आहे. कारण त्यांना IPL साठी एक अधिक आठवडा वेळ मिळावा. तसेच १ कसोटी सामना रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, असा कोणताच प्रस्ताव आला नाही असे ECB ने म्हटलं आहे.

ECB चं प्रसारित झालेलं स्टेटमेंट –

‘BCCI कडून आम्हाला मालिकेत बदल करण्यासंदर्भात पत्र मिळालं. यावरून आम्ही IPL च्या राहिलेल्या सामन्यांच्या आयोजनासाठी तयार आहोत. त्यामुळे या मालिकेतील ५ वा कसोटी सामना IPL २०२१ च्या फायनलनंतर अर्थात ७ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल. असे व्हायरल पत्रात उल्लेख आहे. या दरम्यान मुख्यतः म्हणजे इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB )अशा प्रकारचे कुठलेच निवेदन जाहीर केलेले नाही. व्हायरल होत असलेले पत्र हे खोटे असल्याचे म्हटले आहे.