‘Toofan’ च्या फिल्ममेकरचा मोठा खुलासा, खऱ्या बॉक्सरसोबत लढताना दिसणार Farhan Akhtar

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ओमप्रकाश मेहराचे आधीचे प्रोजेक्ट्स ज्यात ‘रंग दे बसंती’ (2006) आणि ‘भाग मिल्खा भाग’ (2013) चा सामावेश आहे. जे या गोष्टीचा पुरावा आहे की, चित्रपट निर्माता कथेच्या सत्यतेशी तडजोड करीत नाही. म्हणूनच जेव्हा त्याने ‘तूफान’मध्ये एका गुंडाची बॉक्सर बनण्याची स्टोरी दाखविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याने प्रोफेशनल बॉक्सरचा शोध घेतला. ज्यामुळे स्पोर्ट्स ड्रामा अधिक मजबूत बनवू शकेल.

या बॉक्सर्सनी दिले प्रशिक्षण
तर फरहान अख्तरने ड्र्यू नील, समीर जौरा आणि डॅरेल फॉस्टर यांच्या देखरेखीखाली कठोर प्रशिक्षण घेतले आहे, परंतु फरहान अख्तरबरोबर रिंगमध्ये लढू शकेल यासाठी दिग्दर्शकाने रिअल-लाइफ बॉक्सरचा चित्रपटात समावेश केला आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाला, “माझ्यासाठी हे महत्वाचे होते की सर्व सामने खऱ्या बॉक्सरसोबत होतील.” तसेच, दिग्दर्शकाने सांगितले की त्यांच्या निर्मिती संघाने देशभरात या खेळाडूंचा शोध घेतला.

ते म्हणाले, ‘आम्ही ईशान्य, हरियाणा आणि महाराष्ट्रातील बॉक्सरचा समावेश केला आहे. आम्ही अमेरिकेच्या एका व्यावसायिक बॉक्सरचा समावेश केला आहे. चित्रपटाच्या फाइनल सीक्वेंसमध्ये फरहानचे पात्र त्याच्याशी लढताान दिसणार आहे.

21 मे रोजी होणार रिलीज
या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. तुफान’ चे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून फरहान अख्तर आणि मृत्युंजय ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. ‘तूफान’ चा प्रीमियर 21 मे 2021 रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होईल.