सोशल मीडिया सेंसेशन आहे ‘सिंगर’ रिहाना ! फॉलोवर्सच्या बाबतीत जगात Top-5 मध्ये येतं नाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, ॲक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर काहींनी टीकाही केली आहे. बारबाडोसमध्ये एका मिडल क्लास फॅमिलीतून येऊन प्रसिद्धीचं शिखर गाठणाऱ्या रिहानानं आपला तिसरा अल्बम गुड गर्ल गॉन बॅड मधून धुमाकूळ घातला होता. या अल्बममधील साँग अंब्रेलासाठी तिला पहिला ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता. शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर आता भारतात रिहाना बद्दल चर्चा सुरू आहे.

सध्या सगळीकडे तिचीच चर्चा सुरू आहे. तसं तर चर्चेत येण्याची ही तिची काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अनेकदा अटेंशन घेतलं आहे. आपल्या लुक आणि लाईफस्टाईलमुळंही ती चर्चेत आली आहे.

रिहाना एक सोशल मीडिया सेंसेशन आहे. फॉलोवर्स बद्दल बोलायचं झालं तर रिहानाचं नाव जगातील टॉप 5 सेलेब्समध्ये येतं. सोशलवर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे.

रिहानाचे ट्विटरवर 101 मिलियन फॉलोवर्स आहेत. एवढे फॉलोवर्स बॉलिवूडच नाही तर पूर्ण भारतातही कुणाचे नाहीत.

जगात सर्वात जास्त ट्विटर फॉलोवर्स हे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचे आहेत. ओबामांचे ट्विटरवर 128.8 मिलिनय फॉलोवर्स आहेत.

कॅनेडियन सिंगर जस्टीन बीबर या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. त्याचे ट्विटरवर 113.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.

या यादीत तिसऱ्या नंबरवर अमेरिकन सिंगर केटी पेरी आहे. तिचे ट्विटरवर 109.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.

रिहाना चौथ्या क्रमांकावर आहे. तिचे ट्विटरवर 101 मिलियन फॉलोवर्स आहेत.

फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे ट्विटरवर 90.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.