टाचांच्या भेगांमुळं त्रस्त आहात ? सोप्या पद्धतीनं घरच्या घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदीक तेल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांच्या टाचांना भेगा पडल्यानं ते त्रस्त असतात. थंडीत तर हा त्रास आणखी जाणवतो. सतत पाणी किंवा चिखलात काम केल्यानं ही समस्या उद्भवते. यासाठी अनेक उपाय केले जातात. आज आपण यासाठी खास तेल घरीच कसं बनवावं याही माहिती घेणार आहोत. हे तेल पायाच्या टाचाच्या भेगांवर खूप फायदेशीर आहे.

तेलासाठी लागणारं साहित्य –

– नैसर्गिक मेण 50 ग्रॅम
– मोहरीचं तेल 100 ग्रॅम

तेल बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा –

– सर्वात आधी मोहरीचं तेल गरम करा.
– आता यात मेण टाकून वितळून घ्या.
– मेण पूर्ण वितळल्यानंतर त्यात कापूर टाका.
– हे मिश्रण थोडा वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा.
– मिश्रण थंड झाल्यानंतर एका डबीत भरून ठेवा.
– आता तुमचं तेल तयार टाचांच्या भेगांना लावण्यासाठी तयार आहे.

कधी लावावं तेल ?

तयार झालेलं हे आयुर्वेदीक तेल रात्री झोपण्यापू्र्वी टाचांना नियमितपणे लावावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.