Clear Skin Remedy : क्लिअर स्किनसाठी करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ‘गायब’ होतील चेहर्‍यावरील डाग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्हाला सुद्धा बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेससारखी डाग नसलेली आणि स्वच्छ त्वचा हवी आहे का, चेहर्‍यावरील सर्व डाग जावेत आणि चेहरा उजळावा असे वाटते का, तर हे शक्य आहे. अनेक लोक यासाठी महागडे उपचार करतात आणि विविध प्रकारच्या प्रॉडक्टवर पैसे खर्च करतात. पण आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये उपलब्ध होणार्‍या काही अशा वस्तू सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही कमी खर्चात उपाय करू शकता.

1 टोमॅटो
काही दिवस दररोज टामॅटोचे तुकडे आपल्या चेहर्‍यावर चांगल्याप्रकारे हळुवार रगडा, जेणेकरून याचा रस तुमच्या त्वचेत व्यवस्थीत अब्जॉर्ब होईल. 5 मिनिटे असे ठेवून नंतर चेहरा धुवून घ्या. चेहर्‍यावर कापणे किंवा जखमी असेल तर हा उपाय करू नका.

2 बटाटा
काही दिवसापर्यंत दररोज चेहरा स्वच्छ करून बटाट्याचा तुकडा डाग असणार्‍या त्वचेवर 5 मिनिटांपर्यंत हळुवार लावा. यानंतर पाण्याने धुवून मॉयश्चरायजर लावा. काही दिवसातच डाग दूर होईल.

3 पपई
पपईतील पॅपेन एंजाइम स्किन लायटनिंग एजंटचे काम करते. यामुळे डाग दूर होतात. एक पिकलेला पपई घेऊन त्याचे दोन-तीन तुकडे कापून चांगल्याप्रकारे मॅश करा. नंतर त्यामध्ये एक चमचा गुलाबजल मिसळा. ही पेस्ट पूर्ण चेहर्‍यावर लावा. सुखल्यानंतर धुवून टाका. आठवड्यात प्रत्येक दुसर्‍या दिवशी करा.

4 हळद
काही दिवस दररोज एक चतुर्थांश वाटी दुधात अर्धा चमचा हळद मिसळा. हे चेहर्‍यावर लावा आणि 5 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या.

5 एलोवेरा जेल
एलोवेराचे ताजे पान कापून त्याचे जेल काढून घ्या. आता या जेलने रोज चेहर्‍याचा मसाज करा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठून चेहरा धुवून घ्या.