आपण एका FASTag ने 2 गाड्या चालवू शकतो का ?, जाणून घ्या फास्टॅगशी संबंधीत ‘या’ 20 आवश्यक प्रश्नांची उत्तरं

नवी दिल्ली : फास्टॅग देशभरात 15 फेब्रुवारीपासून अनिवार्य झाले आहे. म्हणजे आता फास्टॅगशिवाय नॅशनल हायवे (राष्ट्रीय महामार्ग) चा कोणताही टोल नाका पार करायचा असेल तर दुप्पट शुल्क द्यावे लागेल. सध्या लोकांच्या मनात फास्टॅगबाबत अनेक प्रश्न आहेत. जसे की कुणाकडे दोन गाड्या आहेत तर एकाच फास्टॅगवर त्या चालतील का, फास्टॅग खराब झाला तर काय होणार, कार विकायची असेल तर काय होणार,फास्टॅग कुठून खरेदी करायचा, फास्टॅग हरवला तर काय करायचे, फास्टॅगशी संबंधीत अनेक प्रश्नाची उत्तरे येथे जाणून घ्या…

FASTag ची वैधता किती आहे?
– फास्टॅगची वैधता 5 वर्षांची आहे आणि खरेदी केल्यानंतर वापरानुसार त्यास केवळ रिचार्ज / टॉप करावे लागते.

फास्टॅग कितीला खरेदी करू शकता?
– रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या (भारत सरकार) मार्गदर्शक तत्वांनुसार, फास्टॅगची किंमत 100 रुपये आहे. मात्र, काही बँका मोफत देत आहेत. फास्टॅग लिंक वॉलेटला फंड करण्यासाठी बँका ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज करतात आणि याची पूर्ण माहिती टॅग जारी करणार्‍या बँकांच्या वेबसाइटवर आहे.

जर टोल शुल्क दोन वेळा कापले गेले तर?
– फास्टॅग जारी करणार्‍या बँकेच्या ग्राहक सेवा डेस्कशी संपर्क साधा आणि दोन वेळा शुल्क कापले गेल्याची माहिती द्या. ते तक्रारीची पडताळणी करतील आणि डुप्लिकेट ट्रान्जक्शनसाठी पैसे परत करतील.

मी माझा फास्टॅग कसा बदलू शकतो?
– फास्टॅग बदलण्यासाठी बँकेच्या वेबसाइटवर किंवा एनईटीसी ग्राहक सेवा डेस्कवर जा.

रिफंड न मिळाल्यास काय करावे?
– रिफंड न मिळण्याच्या स्थितीत फास्टॅग जारी करणार्‍या बँकेशी संपर्क साधा.

जर टोल शुल्काची चुकीची कपात झाली तर काय करावे?
– फास्टॅग जारी करणार्‍या बँकेच्या ग्राहक सेवा डेस्कशी संपर्क करा. ते तक्रारीची पडताळणी करून त्या आधारावर अतिरिक्त शुल्कासाठी एक चार्जबॅकचा मुद्दा बनवतील.

जर मी दुसर्‍या शहरात रहायला गेलो तर काय होणार?
– फास्टॅग देशभरातील सर्व सक्षम टोल प्लाझावर काम करेल. दुसर्‍या शहरात शिफ्ट होत असाल तर आपला नवीन पत्ता फास्टॅग जारी करणार्‍या बँकेला द्या.

जर फास्टॅग फाटला, खराब झाला तर काय करावे?
– तर फास्टॅग जारी करणार्‍या बँकेशी संपर्क साधून त्यांना नवीन फास्टॅग देण्यास सांगा.

जर मी माझी कार विकली किंवा ट्रान्सफर केली तर काय होईल?
तर फास्टॅग जारी करणार्‍या बँकेला याची माहिती द्या आणि आपले अकाऊंट बंद करा.

अकाऊंटमधून टोलचे पैसे कापले गेल्याचे कसे समजणार?
– फास्टॅगद्वारे पैसे भरल्यानंतर टोलचे नाव, ट्रांन्जक्शनची तारीख, रक्कम आणि फास्टॅग खात्यात शिल्लक बॅलन्सची माहिती देणारा एसएमएस येतो.

माझ्याकडे दोन गाड्या आहेत, तर एकच फास्टॅग वापरू शकतो का?
– ग्राहक एका वाहनासाठी केवळ एकच फास्टॅगचा वापर करू शकतो. एकदा लावलेला फास्टॅग काढला तर तो खराब होईल, टोल प्लाझावर चालणार नाही.

जर माझा फास्टॅग हरवला तर अकाऊंट बॅलन्सचे काय होईल?
– अशावेळी ताबडतोब बँकेच्या कॉल सेंटरवर कॉल करून माहिती द्या किंवा जवळच्या शाखेत जाऊन माहिती द्या. सोबतच टॅग ब्लॅकलिस्ट करण्यास सांगा. फास्टॅग अकाऊंटमध्ये शिल्लक पैसे ब्लॉक केले जातील. ग्राहक नव्या फास्टॅगसाठी अर्ज करू शकतो आणि आपल्या नव्या फास्टॅग खात्यात बॅलन्स रक्कम ट्रान्सफर करू शकतो किंवा बँकेकडून शिल्लक रक्कम परत घेऊ शकतो.

जर माझी गाडी हरवली तर, फास्टॅग खाते कसे बंद करायचे?
– फास्टॅग जारी करणार्‍या बँकेच्या कस्टमर केयर नंबरवर कॉल करा आणि आपले खाते ब्लॉक करायला सांगा.

जर फास्टॅग रिचार्ज केले, पण फास्टॅग खात्यात पैसे जमा झाले नाही तर काय होणार?
– अशावेळी आपल्या बँकेच्या कस्टमर केयर नंबरवर कॉल केला पाहिजे आणि पैसे परत करण्याबाबत तक्रार करावी.

खातेधारक आणि वाहनाचा मालक एकच असणे आवश्यक आहे का?
– फास्टॅग वाहनाशी संबंधीत आहे आणि कोणतेही बँक अकाऊंट याच्याशी लिंक करता येते. परंतु, ज्याचे बँक खाते आहे, तो वाहन मालकाचा रक्ताचा नातेवाईक असावा.

मी फास्टॅग कसा खरेदी करू शकतो?
– यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही एनईटीसीची सदस्य बँक / त्याचे डिस्ट्रिब्यूशन एजंट / त्यांच्या सेल्स ऑफिसचे टोल प्लाझा / झेड (पॉईंट ऑफ सेल) (झेड) आऊटलेट्समध्ये कुणाकडूनही खरेदी करू शकता. फास्टॅग संबंधित बँकेची वेबसाइट किंवा http://www.nhai.gov.in वर सुद्धा ऑनलाइन अर्ज करू शकतो.

ग्राहकांला फास्टॅगसाठी कोणती कागदपत्र द्यावी लागतात?
– 1. बैंकेने जारी केलेला साइन केलेला फॉर्म ग्राहकांना भरून द्यावा लागतो. 2. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) 3. वाहन मालकाचा पासपोर्ट साईज फोटो 4. श्रेणीनुसार वाहन मालकाचे केवायसी कायदपत्र 5. वैध ड्रायव्हिंग लायसन्स 6. वाहनाचे छायाचित्र (ऐच्छिक)

फास्टॅग जारी करणार्‍या बँका कोणत्या?
आयसीआयसीआय बँक
पेटीएम पेमेंट्स बँक
आयडीएफसी फर्स्ट बँक
एसबीआय बँक
एचडीएफसी बँक
अ‍ॅक्सिस बँक
इक्विटास बँक
केव्हीबी बँक
कोटक महिंद्रा बँक
येस बँक
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ महाराष्ट्र
सिटी यूनियन बँक
फेडरल बँक
साउथ इंडियन बँक
इंडसइंड बँक
सारस्वत कॉप बँक
एयरटेल पेमेंट्स बँक
सिंडीकेट बँक
पीएनबी बँक
नागपुर नागरिक कॉपरेटिव्ह बँक
यूनियन बँक
फिनो पेमेंट्स बँक
कॅनरा बँक
करूर व्यास बँक
पंजाब महाराष्ट्र अँड कोपरेटिव्ह बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एयू स्मॉल फाइनान्स बँक
इलाहाबाद बँक

एनईटीसी काय आहे?
– नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संग्रह) सिस्टममुळे ग्राहक फास्टॅग टेक्नोलॉजीचा वापर करून नॅशनल हायवेच्या टोलवर न थांबता एनईटीसीशी जोडलेल्या टोलवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे भरू शकतात.

एनपीसीआय फास्टॅग जारी करते का?
– नाही, एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोशन ऑफ इंडिया) फास्टॅग जारी करत नाही. एनपीसीआयने एनईटीसी सिस्टम तयार केली आहे जी इलेक्ट्रॉनिक प्रकारे टोल भरण्याची सुविधा देते.