पॅन कार्ड वरील वडिलांचे नाव होणार इतिहासजमा

नवी दिल्ली :वृत्तसंस्था

प्राप्ती कर भरण्याससोबतच पॅन कार्ड म्हणजे महत्वाच्या ओळखपत्रापैकी एक मानले जाते. पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचे नाव नमूद करणे हे सक्तीचे होते. आता मात्र पॅन कार्डवर वडिलांचे नाव अनिवार्य असण्याचा नियम लवकरच इतिहासजमा होणार आहे. यासाठी प्राप्तिकर विभागाच्या संबंधित कलमामध्ये बदल करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’19e713b4-af62-11e8-a9a4-a17cd6f6e362′]

एकल माता असणाऱ्या महिलांच्या मुलांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. एकल मातांच्या मुलांनाही पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचे नाव नमूद करणे सक्तीचे होते. त्यामुळे अनेकांची कुचंबणा व अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर खात्याला अनेक सूचना प्राप्त झाल्या होत्या. अनेकांसाठी अडचणीचा ठरणारा हा नियम रद्द करावा अशी जोरदार मागणीही सातत्याने होत होती.

जाहिरात

यानुसार कलम ११४ मध्ये बदल सुचविणारा एक मसुदा प्राप्तिकर खात्याने जारी केला असून त्यावर १७ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत. यानंतर हा नियमबदल अस्तित्वात येईल. पॅन कार्ड वितरित करण्यासाठी कोणकोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे याचा तपशील प्राप्तिकर अधिनियम १९६२च्या कलम ११४मध्ये नमूद करण्यात आला आहे.

जाहिरात