‘जेनेलिया-नाना पाटेकर’ यांचा ‘हा’ सिनेमा TV वर होणार प्रदर्शित ! तब्बल 10 वर्ष रखडलं होतं प्रदर्शन

पोलिसनामा ऑनलाइन – डायेरक्टर बोनी कपूर (Boney Kapoor) यांचा असा एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जो तब्बल 10 वर्ष रखडला होता. एखादा सिनेमा क्वचित एवढा रखडला असावा. तसं पाहिलं तर 10 वर्षांपूर्वीच हा सिनेमा बनून तयार होता. परंतु काही कारणास्तव तो बॉक्स ऑफिस गाठू शकला नव्हता.

या सिनेमाचं नाव इट्स माय लाईफ (Its My Life) आहे. खास बात अशी की, यात जेनेलिया डिसूजा देशमुख (Genelia D’Souza) आणि हरमन बावेजा (Harman Baweja) मुख्य भूमिकेत आहेत तर नाना पाटेकर (Nana Patekar) आणि कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) हे देखील महत्त्वाच्या भमिकेत दिसणार आहेत.

खास बात अशी की, हा सिनेमा कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर थेट टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार आहे. खुद्द सिनेमाचे प्रोड्युसर बोनी कपूर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं आहे.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा

हा सिनेमा 29 नोव्हेंबर रोजी झी सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. बोनी यांचं ट्विट समोर आल्यानंतर जेनेलियानंही आनंद व्यक्त करत हे रिट्वि रिट्विट केलं आहे. बोम्मारिलू (Bommarillu) या तेलगू सिनेमाचा हा रिमेक आहे. नानांनी सिनेमात हरमनच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. अनीस बज्मी (Anees Bazmee) यांनी सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. 2007 सालीच या सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं होतं.