…म्हणून अर्थमंत्र्यांनी घातले सिद्धिविनायकाला ‘साकडे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याचा सन २०१९ -२० या आर्थिक वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन राज्याला आर्थिक समृद्धी व भरभराटीसाठी ‘साकडे’ घातले.

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महत्वाच्या घोषणा करणार आहेत . त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूका जेमतेम दोन-तीन महिन्यावर येऊन ठेपल्याने या घोषणा लोकप्रिय ठरणार का ? याकडे लक्ष लागले आहे. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडत आहेत.२७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला होता. मात्र लोकसभेची आचारसंहिता व निवडणूक वर्ष यामुळे तो अंतरिम अर्थसंकल्प होता. मात्र आता मुनगंटीवार हे अतिरिक्त अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि राज्याला भरभराट आणि समृद्धीसाठी साकडेही घातले. त्यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

– अतिरिक्त अर्थसंकल्पातील काही ठळक बाबी –

शेतकऱ्यांची वीज खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

६ हजार चारा छावण्या सुरु. लक्षावधी जनावरे दाखल, अनुदानात वाढ.

चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी

कृत्रिम पावसासाठी तरतूद

पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना जाहीर

राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर

प्रलंबित सिंचन प्रकल्प लवकर पूर्ण करणार

जलसिंचन योजनांसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे विमा योजना. संपूर्ण कुटुंबाला मिळणार लाभ. साडेपाच कोटी लोक विम्याच्या कक्षेत.

चंद्रपूरमध्ये होणार कृषी महाविद्यालय

गटशेतीसाठी नवीन योजना. २०५ गट स्थापन. १०० कोटींची तरतूद.

काजू उत्पादकांसाठी प्रक्रिया उद्योगासाठी १०० कोटीची तरतूद.

१२१ गोशाळांना प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान

वेंगुर्ल्यात खेकडा, जिताडा उत्पादन केंद्र

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन