Financial Fraud | 3 वर्षात निम्मे भारतीय आर्थिक फसवणुकीला पडले बळी, ‘या’ लोकांना बनविले निशाणा

नवी दिल्ली : Financial Fraud | मागील तीन वर्षात सुमारे निम्मे भारतीय आर्थिक फसवणुकीला बळी पडले आहेत. लोकल सर्कलद्वारे करण्यात आलेल्या सर्वेत समजले की, भारतात आर्थिक फसवणूक सामान्य झाली आहे. यातून फ्रॉडचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. सर्वेत ३०२ जिल्ह्यातील २३,००० सहभागींपैकी समारे निम्म्या (४७%) लोकांनी मागील तीन वर्षात कोणत्या ना कोणत्या आर्थिक फसवणुकीला दुजोरा दिला. (Online Cheating Fraud Case)

या फ्रॉडच्या घटनांमध्ये युपीआय आणि क्रेडिट कार्ड संबंधीत प्रकरणे सर्वात जास्त समोर आली आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

युपीआय यूजर निशाण्यावर

नुकत्याच झालेल्या सर्वेत दोन मुख्य क्षेत्र युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) आणि क्रेडिट कार्डवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

क्रेडिट कार्ड फसवणूक :

क्रेडिट कार्ड फसवणुकीचा अनुभव घेतलेल्या निम्म्यापेक्षा जास्त (५३%) सहभागींनी घरगुती आणि अंतरराष्ट्रीय व्यापारी अथवा वेबसाइटने लावलेल्या अनधिकृत शुल्कांची माहिती दिली आहे.

युपीआय फसवणूक :

या सर्वेत सहभागी झालेल्या लोकांच्या एका मोठ्या संख्येने (३६%) युपीआयद्वारे फसवणुकीच्या व्यवहारांची सुद्धा माहिती दिली आहे.

सर्वेत समोर आले की, कमी तक्रार दराने समस्या आणखी वाढवली आहे. लोकल सर्कलचा अंदाज आहे की, १० पैकी ६ भारतीय आर्थिक फसवणुकीची माहिती अधिकाऱ्यांना देत नाहीत. तक्रारींच्या कमतरतेमुळे समस्या योग्य प्रकारे ट्रॅक करणे आणि त्यावर कारवाई करणे अवघड होते.

ताबडतोब कारवाईची गरज

सर्वेत या समस्येला तोंड देण्यासाठी काही उपाय सुद्धा सांगितले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे यापासून बचाव करू शकता. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मजबूत सुरक्षा उपाय आणि फसवणूक रोखण्यासाठी प्रणाली लागू करण्याची गरज आहे.

लोकांमध्ये आर्थिक सुरक्षेच्या योग्य पद्धती आणि फसवणुकीची तक्रार करण्याच्या गरजेविषयी जागृतता पसरवण्याची गरज आहे, जेणेकरून ते फसवणुकीपासून वाचू शकतील.

आरबीआयच्या आकड्यात दिसली वाढ

सर्वेत आरबीआयच्या आकड्यांवर देखील भाष्य करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये फसवणुकीच्या एकुण प्रकरणांचा आकडा १३,९३० कोटी रुपये होता, जो मागील वर्षांच्या तुलनेत जवळपास निम्मा आहे. मात्र, प्रकरणांच्या संख्येत १६६% ची आश्चर्यकारक वाढ दिसून आली आहे.

आर्थिक फसवणुकीची वाढ आणि कमी तक्रारीचा दर सांगून, सर्वेत अधिकारी आणि नागरिकांसाठी एक इशारा जारी केला आहे. या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी मजबूत सुरक्षा उपाय लागू करणे आणि जागृतता वाढवणे आवश्य आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gautam Adani | गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सीमेंट कंपनी, 10442 कोटीत डील फायनल; काय आहे पूर्ण प्‍लान?

NDA Modi Govt | स्वयंपाक घरासाठी गुड न्यूज, आता भाज्यांवर लक्ष ठेवणार सरकार, भाव वाढल्यास हस्तक्षेप करणार

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार