iPhone वापरकर्ते Gmail वर या Tips च्या मदतीनं करू शकतील कॉन्टॅक्ट चॅट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google ने iOS साठी चॅट इंटिग्रेशन अर्थात सवांद (Chat integration) फीचर जाहीर केले आहे. गुगल अनेक सेवा सुविधा वापरकर्त्यांसाठी आणत असते. गुगलने चॅट इंटिग्रेशन रिलीज केले आहे. Google काही कालावधीसाठी सर्व युजर्ससाठी Gmail अ‍ॅप एक स्टॉप शॉप तयार करत आहे. यामध्येच गूगल मीट एकत्रीकरण याअगोदरच कनेक्ट केले आहे. तर सध्या चॅट फीचर देखील आले आहे. यावरून आता Gmail युजर्सना Hangout वापरण्याही गरज नसणार आहे.

या नव्या फीचरवरून Roll out होणाऱ्या अ‍ॅपद्वारे डायरेक्ट संपर्क चॅट होणार आहे. हे चॅट्स पर्याय वैशिष्ट्य केवळ आयफोनवर उपलब्ध आहे. आपण Android वापरकर्ता असल्यास, तर तुम्हाला याकरिता प्रतीक्षा करावी लागेल. हे वैशिष्ट्य अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी केव्हा येईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तर याचे फीचर फक्त iOS साठी असणार आहेत. या माध्यमानुसार संपर्क साधणे सहज आणि सोपे झाल्याचे दिसते. आपण iPhone मधील Gmail वर आपल्या संपर्कांशी chat कसे करायचे हे जाणून घ्या.

असे करा iPhone मध्ये Gmail वर संपर्कांशी chat –
> आधी iPhone ची गरज आहे, ज्यामध्ये व्यक्तीला Gmail अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती (6.0.210404) डाउनलोड करावी लागणार आहे.
> iOS मध्ये चॅट पर्याय मिळविण्यासाठी, आपल्याला साइड मेनूवर सहज टॅप करावे लागेल.
> सेटिंग्जसाठी खाली स्क्रोल करा आणि आपल्या खात्याच्या नावावर टॅप करा.
> येथे आपल्याला चॅट्सचा पर्याय दिसेल. मग Toggle चालू करा.
> Gmail अ‍ॅप तुम्हाला अ‍ॅप Restart करण्यास सांगेल, त्यानंतर तुम्हाला परवानगी द्यावी लागणार आहे.
> यानंतर Meat आणि Gmail च्या बाजूला खालच्या पट्टीवर Chats पर्याय दिसेल.

समजा पर्याय उपलब्ध नाही?
> आपल्याला अपमध्ये chat पर्याय दिसत नसेल तर तुम्हाला Gmail च्या Desktopआवृत्तीवर जावे लागणार आहे .
> येथे आपल्याला सेटिंग्ज निवडा आणि नंतर chat पर्यायावर जाने.
> त्यानंतर Google Chat ऑप्शन निवडायचा आहे.