Bank holiday list : 26 मार्चपर्यंत उरकून घ्या महत्वाची कामे, नाही तर पुढील 10 दिवसात केवळ 2 दिवस खुल्या राहतील बँका

पोलीसनामा ऑनलाईन : हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असून बँकेसह वित्तीय क्षेत्रासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. 31 मार्चपर्यंत सर्व बँकांना या आर्थिक वर्षासाठी आपले खाते बंद करावे लागेल. हेच कारण आहे की जर बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर निकाली काढा. जर आपण 26 मार्चपर्यंत बँकिंगचे काम पूर्ण केले नाही तर आपल्याला एक आठवडा जास्त काळ थांबावे लागेल. अशा परिस्थितीत जाणून घेऊया मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील बँक हॉलिडेबद्दल…

बँक सुट्टीची यादी :

-रविवार, 21 मार्च रोजी बँका बंद राहतील आणि 22 मार्च ते 26 मार्च दरम्यान बँका खुल्या असतील.

– 27 मार्च दुसरा शनिवारी असल्याने बँका बंद असतील.

– 28 मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील.

– 29 मार्च रोजी होळीमुळे बँक बंद.

-30 मार्च रोजी पाटण्यातील बँका बंदच राहतील, तरी इतर शहरांतील बँका खुल्या राहतील.

– 31 मार्च, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस, असल्याने सार्वजनिक व्यवहार सुरू राहणार नाही.

– 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस पण बँक अकाउंट क्लोजींगमध्ये व्यस्त.

– गुड फ्रायडेमुळे 2 एप्रिल रोजी बँका बंद असतील.

– बँक 3 एप्रिल रोजी खुली होईल.

– रविवार 4 एप्रिल रोजी बँक बंद .

– बँकेचे सामान्य कामकाज 5 एप्रिलपासून सुरू होईल.