शताब्दी एक्सप्रेसच्या जनरेटर कारला आग

गाझियाबाद : गाझियाबाद रेल्वे स्थानकात आलेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या जनरेटर कारला आज सकाळी आग लागली. ही घटना सकाळी पावणे सात वाजता घडली.

दिल्ली – लखनौ शताब्दी एक्सप्रेस ही गाझियाबाद रेल्वे स्थानकात आली होती. त्याचदरम्यान एक्सप्रेसच्या शेवटी असलेल्या जनरेटर कारच्या डब्याला आग लागली. ही आग जनरेटर कारपुरती मर्यादित राहिली. आग लागल्याचे दिसताच हा डब्बा एक्सप्रेसच्या डब्यांपासून तातडीने बाजूला करण्यात आला. ही आग तातडीने विझविण्यात आली. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यानंतर ८ वाजून २० मिनिटांनी शताब्दी एक्सप्रेस लखनौच्या दिशेने रवाना झाली.