Corona guidelines for kids : मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी जारी झाली गाईडलाईन, पालकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या संख्येने मुलेसुद्धा वेगाने संक्रमित होत आहेत. हे पाहता आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदा मुलांसाठी कोविड-19 ची गाईडलाईन जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दोन डॉक्यूमेंट जारी केले आहेत. ज्यापैकी एक आहे मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी रिव्हाईज्ड गाईडलाईन्स आणि पीडिएट्रिक एज ग्रुप म्हणजे मुलांच्या उपचारासाठी मॅनेजमेंट प्रोटोकॉल.

माईल्ड इन्फेक्शनसाठी गाईडलाईन-
जर मुलांमध्ये इन्फेक्शनची माईल्ड म्हणजे हलकी लक्षणे आहेत, जसे की, घशात खवखव किंवा वेदना, कफ, परंतु श्वास घेण्याबाबत कोणतीही समस्या नसेल तर…
* मुलाला होम आयसोलेशनमध्ये ठेवा
* शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी जास्तीत जास्त पाणी पाजा, द्रवपदार्थ द्या.
* जर ताप येत असेल तर 10-15 एमजी पॅरासिटामोल द्या
* काही धोकादायक लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

मॉडरेट म्हणजे मध्यम श्रेणीचे इन्फेक्शन झाल्यास-
* या कॅटगरीत अशा मुलांचा समावेश केला आहे ज्यांची ऑक्सीजन लेव्हल कमी आहे. परंतु मुलांमध्ये निमोनियाचे कोणतेही लक्षण नाही.
* मॉडरेट म्हणजे मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले जाऊ शकते.
* या दरम्यान त्यांना द्रव पदार्थ जास्त द्यावेत जेणेकरून डिहायड्रेशन होऊ नये. सोबतच ओव्हर हायड्रेशन सुद्धा टाळा.
* तापासाठी पॅरासिटामोल आणि जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अमोक्सिसिलिन देऊ शकता.
* जर मुलाच्या शरीरात ऑक्सीजन सॅच्युरेशन 94% पेक्षा कमी असेल तर मुलाला ऑक्सीजन दिला पाहिजे.
* या स्टेजला मुलांमध्ये गंभीर निमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम आणि सेप्टिक शॉक सारखी गंभीर लक्षण दिसू शकतात.
* अशा मुलांना ताबडतोब आयसीयू किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गाईडलाईनमध्ये या मुलांचे कम्प्लीट ब्लड काउंट, लिव्हर, रीनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला दिला आहे.