व्हेल माशाच्या उलटीने नशीब उजळले; मच्छीमाराच्या हाती लागला 25 कोटींचा ‘खजिना’

थायलंड : वृत्तसंस्था – कधी-कधी असे होते की, अपेक्षापेक्षा इतके जास्त मिळते की, याबाबत तुम्ही कधी विचारही केलेला नसतो. असेच एक प्रकरण थायलंडमध्ये समोर आले आहे. येथे एक मच्छीमार एका रात्रीत कोट्यधीश बनला. आश्चर्य म्हणजे, हा मच्छीमार व्हेल माशाच्या उलटीमुळे कोट्यधीश झाला आहे.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, नारिस नावाचा एक मच्छीमार व्हेलच्या उलटीला मामुली दगड समजत होता, परंतु त्याची किंमत 24 लाख पाउंड (सुमारे 25 कोटी रुपये) आहे. याचे वजन सुमारे 100 किलो आहे. यासोबतच हा आतापर्यंत सापडलेल्या एम्बरग्रीसचा सर्वांत मोठा तुकडा आहे.

महिन्याला 500 पाउंड कमावणार्‍या नारिसने कधी विचारही केला नसेल की तो ज्यास दगड समजत आहे, तो 24 लाख पाउंडचा एम्बरग्रीस आहे. नारिसचे म्हणणे आहे की, एका बिझनेस मॅनने मान्य केले आहे की, जर याची क्वाॅलिटी चांगली निघाली तर यासाठी तो 23,740 पाउंड प्रतिकिलोची किंमत देईल. नारिसने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनासुद्धा याबाबत माहिती दिली आहे.

शास्त्रज्ञांच्या भाषेत यास एम्बरग्रीस म्हणतात. अनेक शास्त्रज्ञ यास व्हेलची उलटी सांगतात तर अनेक यास शौच सांगतात. हा व्हेलच्या शरीरातून निघणारा टाकाऊ पदार्थ आहे, जो त्याच्या आतड्यांमधून निघतो आणि तो यास पचवू शकत नाही. अनेकदा हा पदार्थ रेक्टमद्वारे बाहेर येतो, परंतु कधी कधी हा पदार्थ मोठा असल्याने व्हेल तो तोंडातून बाहेर टाकतो.

एम्बरग्रीस व्हेलच्या आतड्यांमधून निघणारा स्लेटी किंवा काळा या रंगाचा एक ठोस, मेणासारखा ज्वलनशील पदार्थ आहे. हा व्हेलच्या शरीरात त्याच्या रक्षणासाठी तयार होतो, जेणेकरून त्याच्या आतड्यांना स्क्विडच्या टोकदार चोचीपासून वाचवता येईल. सामान्यपणे व्हेल समुद्राच्या किनार्‍यापासून खुप दूर राहतात, अशावेळी त्यांच्या शरीरातून निघालेला हा पदार्थ समुद्राच्या किनार्‍यावर येण्यास अनेक वर्षे लागतात.