Flipkart Online Sale | सणासुदीच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट कंपनीच्या बाबतीत आली महत्त्वाची अपडेट, खरेदी करण्यापुर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पोलीसनामा ऑनलाइन – Flipkart Online Sale | देशामध्ये सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लाखो लोक खरेदी करत आहेत. सध्याच्या काळामध्ये अनेक जण ऑनलाइन शॉपिंग हा पर्याय निवडत असून घरी बसून शॉपिंग करत आहेत. घरबसल्या डिलेव्हरी यामुळे लोकांची ई कॉमर्स वेबसाईटला पसंती मिळत आहे. यामध्ये ॲमॅझोन (Amazon) व फ्लिपकार्ट (Flipkart) या लोकप्रिय वेबसाईट आहेत. सणासुदीच्या काळामध्ये भरघोस सूट व ऑफर (Flipkart Online Sale) मिळत असतात. या फ्लिपकार्ट या वेबसाईटबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता अमेरिकन कंपनीने (American Company) फ्लिपकार्टमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

आपल्या देशामध्ये फ्लिपकार्ट व ॲमेझॉन या ई कॉमर्स कंपन्यांनी मोठे जाळे विणले आहे. कपडे, घरगुती वस्तू, दागिने, जीवनाश्यक वस्तू अशा अनेक गोष्टींच्या खरेदीसाठी (Online Shopping) फ्लिपकार्टला पसंती दिली जाते. आता भारतीय ई-कॉमर्स उपकंपनी फ्लिपकार्टमध्ये अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ने (American retail company ‘Walmart) आपला हिस्सा वाढवला आहे. वॉलमार्टने 31 जुलै 2023 या सहा महिन्यांत त्याच्या गैर-नियंत्रित भागधारकांकडून शेअर्स घेण्यासाठी $3.5 अब्ज (सुमारे 28,953 कोटी रुपये) दिले आहेत. फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये आता वॉलमार्टने त्यांची हिस्सेदारी वाढवली आहे.

वॉलमार्ट या अमेरिकन कंपनीने अनेक भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे.
आता फ्लिपकार्टमध्ये देखील या कंपनीने आपले शेअर्स वाढवले आहेत. मागील सहा महिन्यांत,
कंपनीला PhonePe च्या इक्विटी फायनान्सिंगच्या (Equity Financing) नवीन फेरीतून $700 दशलक्ष मिळाले आहेत.
वॉलमार्टने सांगितले की, “सहा महिन्यांच्या कालावधीत, कंपनीने फ्लिपकार्टच्या काही गैर नियंत्रित भागधारकांकडून
शेअर्स घेण्यासाठी आणि PhonePeच्या माजी गैर नियंत्रित भागधारकांच्या दायित्वांची पुर्तता करण्यासाठी $3.5 अब्ज
देण्यात आले आहे,”

‘वॉलमार्ट’ या अमेरिकन कंपनीचे अनेक भारतीय कंपन्यांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आपली भागिदारी वाढवली आहे.
फ्लिपकार्ट कंपनीमध्ये (Flipkart Online Sale) भागीदार वाढून 80.5 टक्के हिस्सेदारी होईल.
फ्लिपकार्ट बरोबरच फोन पे या डिजिटल पेमेंट (Digital Payments) असणाऱ्या भारतीय कंपनीमध्ये देखील
वॉलमार्ट कंपनीने तिची हिस्सेदारी वाढवली आहे. डिजीटल पेमेंट मार्कटमध्ये फोन पे हे ऑनलाइन पेमेंटसाठी एक
लोकप्रिय पर्याय आहे. तसेच PhonePe लोकांना UPI अंतर्गत पेमेंट करण्याची सुविधा देखील देत असल्यामुळे
कोरोडो युजर्स हे याचा वापर करत आहेत. PhonePe चे भारतातही बरेच वापरकर्ते आहेत आणि आणि
अमेरिकन कंपनी वॉलमार्कची भागेदारी यामध्ये देखील सर्वात जास्त आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Crime News | ‘ACP, DCP, CP कोणीही असो, माझ्या समोर येण्याची पोलिसांची ताकद नाही’, पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी मागणार्‍या एकनाथ अडसूळ विरूध्द गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ