Food Plaza On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटी होणार आधुनिक आणि आकर्षक ! १०० दुकानांच्या दुमजली ‘खाउगल्ली’त खाद्यपदार्थांची राहाणार रेलचेल

विकास आराखडा आणि एस्टीमेटला मान्यता – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Food Plaza On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटीचे रुपडे पालटणार आहे. याठिकाणचा रस्ता बंद करून दुमजली ‘खाउगल्ली’ उभारण्यात येणार आहे. तसेच सुमारे २०० वाहनांच्या पार्किंगसाठी बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. सुमारे १८ कोटी ५० लाख रुपयांच्या या कामाच्या विकास आराखड्यास आणि एस्टीमेटला मान्यता देण्यात आली असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती महापालिका Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Food Plaza On Sarasbaug Chowpatty)

शहरातील सर्वात मोठे उद्यान असलेल्या ऐतिहासिक सारसबागेच्या चौपाटीला नवा लूक देउन अधिकाअधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. सध्या चौपाटीवर अस्तित्वात असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे त्याचठिकाणी पुनर्वसन करताना जागतिक दर्जाच्या ब्रँडसच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असतील असे नियोजन करण्यात आले आहे. सध्या सारसबाग आणि सणस मैदानाच्या दरम्यान ५० हून अधिक स्टॉल्स आहेत. तसेच मध्यल्या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येतो. या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी घोडेस्वारी व अन्य खेळणी व्यावसायीक देखिल असतात. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सबाहेर विक्रेत्यांच्या टेबल खुर्च्या आणि उन पावसापासून वाचण्यासाठी मारलेले शेडस्मुळे या भागाला बकाल स्वरूप प्राप्त होते. (Food Plaza On Sarasbaug Chowpatty)

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने या ठिकाणी सुनियोजीत दुमजली खाउ गल्ली, याठिकाणी साधारण १०० दुकाने असतील,
नागरिकांना मुक्तपणे बसता यावे यासाठी बसण्याची आकर्षक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, वाहनांसाठी प्रशस्त
पार्कींग अशी रचना असलेला विकास आराखडा तयार केला आहे. या कामासाठी १८ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे.
या कामाच्या विकास आराखड्याला आणि एस्टीमेटला सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
लवकरच या कामाची निविदा काढण्यात येईल, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोळा मारुन ओढले मिठीत; तरुणाला अटक

पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार, चार जणांना अटक; सहकारनगर परिसरातील घटना