देशाचा परकीय चलन साठा पोहचला 583.865 अब्ज डॉलर्सपर्यंत; जाणून घ्या कसा होईल फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 19 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा परकीय चलन साठा 169 दशलक्ष डॉलर्सने वाढून 583.865 अब्ज डॉलर इतका झाला. भारती रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 12 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 249 दशलक्ष डॉलर्सने घसरून 583.697 अब्ज डॉलरवर आला आहे. 29 जानेवारी 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठा 590.185 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.

यामुळे झालीय परकीय चलन साठ्यात वाढ :
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (एफसीए) वाढीमुळे पैशांच्या साठ्यात वाढ झाली. परकीय चलन मालमत्ता हा एकूण परकीय चलन साठ्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे. रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, एफसीए 1.155 अब्ज डॉलर्सने वाढून 542.106 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. एफसीए डॉलरमध्ये नामांकित आहे, परंतु त्यात युरो, पौंड आणि येन सारख्या इतर परकीय चलन मालमत्तांचा समावेश आहे.

देशात सोन्याचे साठ्यात घसरण :
आकडेवारीनुसार देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य 97.7 दशलक्ष डॉलर्सने घसरून 35.25 अब्ज डॉलरवर गेले आहे. आंतरराष्ट्रीय फंड फॉर मनी (आयएमएफ) मध्ये देशाला मिळालेले विशेष रेखांकन अधिकार 40 दशलक्ष डॉलर्सने कमी होऊन 1.08 अब्ज डॉलरवर गेले आहेत. आयएमएफकडे असलेला राखीव साठाही 40 दशलक्ष डॉलर्सने घसरून 5.002 अब्ज डॉलर्सवर आला आहे.

जाणून घेऊया, परकीय चलन साठा म्हणजे काय आणि त्याचा देशाला कसा फायदा होतो ?

पहिल्यांदा पाहू, परकीय चलन साठा म्हणजे काय?
परकीय चलन साठा हा निधी किंवा देशातील मध्यवर्ती बँकांकडे असलेली इतर मालमत्ता आहेत, जी आवश्यकतेनुसार देणे-घेणे करण्यासाठी वापरली जातात. निरोगी अर्थव्यवस्थेसाठी पुरेसे परकीय चलन साठा अत्यंत महत्त्वाचा आहे. आयातीला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संकट आल्यास अर्थव्यवस्थेला ती आवश्यक मदत करते. यामध्ये आयएमएफमधील परकीय चलन मालमत्ता, सोन्याचे साठा आणि इतर साठा यांचा समावेश आहे, त्यापैकी सोन्यानंतर परकीय चलन मालमत्तेचा सर्वाधिक वाटा आहे.

परकीय चलन साठाचे चार मोठे फायदे :
1) 1991 मध्ये देशाला पैसे उभे करण्यासाठी सोने तारण ठेवावे लागले. त्यानंतर भारताला केवळ 40 करोड डॉलरसाठी इंग्लंडकडे 47 दशलक्ष सोने ठेवावे लागले होते. परंतु सध्याच्या स्तरावर भारताकडे एका वर्षापेक्षा जास्त आयात करण्यासाठी पुरेसा पैसा साठा आहे. म्हणजेच, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीचा आयात खर्च सहजपणे पूर्ण करू शकतो, हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे.

2) चांगले परकीय चलन राखीव असलेला देश परदेशी व्यापाराचा चांगला वाटा आकर्षित ठरतो आणि व्यापार भागीदारांचा विश्वास संपादन करतो. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना देशात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.

3) सरकार आवश्यक सैन्य वस्तू त्वरित खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकते. कारण, देण्यासाठी पुरेसे परकीय चलन उपलब्ध आहे.

4) याव्यतिरिक्त, परकीय चलन बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी परकीय चलनसाठा प्रभावी भूमिका बजावू शकतो.

अशा प्रकारे या विदेशी परकीय चलन साठ्याचा उपयोग देशाला होईल.