माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुन्हा एकदा पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षाकडून अर्ज केला जाणार आहे.

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी मंगळवारी (दि.15) अटक (Arrest) केली. बुधवारी (दि.16) त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी (दि.19) पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी (Magistrate Custody) सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात (Yerwada Jail) करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एक चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी गाडीत बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर जाधव आणि इशा झा यांनी चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी हर्षवर्धन जाधव यांना अटक करुन सकाळी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले.