Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनी दोन दिवसांपूर्वी बीआरएस पक्षात (BRS Party) प्रवेश केला. बीआरएसमध्ये प्रवेश करताच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना आव्हान दिले आहे. त्यांनी दानवेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षांनं संधी दिली तर आपण विधानसभेची निवडणूक (Assembly Election-2024) कन्नड मतदारसंघातून संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या विरोधात तर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election -2024) जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढवणार असल्याचे हर्षवर्धन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर दानवे विरुद्ध जाधव असा सामना (Maharashtra Politics News) रंगणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हर्षवधन जाधव (Former MLA Harshvardhan Jadhav) यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (Bharat Rashtra Samiti Party) प्रवेश केला आहे. हैदराबादमध्ये चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. आपण लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं. जाधव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू शकतात.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केले. यावर बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी
नामांतरावर आक्षेप घेण्याची गरज नाही. बॉम्बेचं मुंबई झालं तेव्हा कुणी आक्षेप घेतला का?
असा प्रश्न उपस्थित केला. तुमचं सरकार आहे तुम्ही वाटेल ते नाव ठेवा पण जनतेला प्यायला पाणी द्या असा
टोला त्यांनी लगावला.

Web Title :-   Former MLA Harshvardhan Jadhav | harshvardhan jadhav will contest election from jalna lok sabha constituency against raosaheb danve

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Leader Rahul Gandhi | ‘मी सावरकर नाही, माफी मागणार नाही’, राहुल गांधी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य (व्हिडिओ)

ACB Trap On Police Inspector Vijay Mane | 1 लाख रूपये किंवा iPhone मोबाईलची मागणी करून लाच घेणार्‍या पोलिस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Pune Crime News | धक्कादायक ! भरधाव कारला अडविणार्‍या ट्रॅफिक पोलिसाला चालकाने बोनेटवरून 50 मीटरपर्यंत फरफटत नेलं, खडकीतील घटना