Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती स्थिर, उद्या घरी सोडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Former President Pratibha Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसून त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून, त्यांना उद्या सकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती प्रतिभाताई पाटील यांचे निकटवर्तीय अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली.(Former President Pratibha Patil)

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याने तातडीने उपचारासाठी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांचे वय ८९ वर्ष असून छातीत इन्फेक्शन आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. काही दिवसांपासून पाटील यांची प्रकृती खराब आहे. बुधवारी अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

प्रतिभा पाटील यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज गुरुवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली असल्याची बातमी पसरली.
त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत असून डॉक्टरांच्या
देखरेखीखाली आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून उद्या (शुक्रवारी) त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर सामना रंगणार?, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष

Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024 | ”महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण, ४८ लोकसभा मतदारसंघांची…”, संजय राऊत यांची महत्वाची माहिती

NCP Sharad Pawar On Modi Govt | ”भाजपाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट”, शरद पवार यांचा मोदी सरकारवर आरोप