Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024 | ”महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण, ४८ लोकसभा मतदारसंघांची…”, संजय राऊत यांची महत्वाची माहिती

नाशिक : Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024 | राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी तयार आहे. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत (Seat Sharing) अजिबात संभ्रम नाही. ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्र जाहीर केली जाईल. जागावाटप पूर्ण झाले आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे (Shivsena UBT) मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांना दिली.

शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, कलाबेन डेलकर यांचे नाव भाजपाच्या यादीत आहे. तरी ती जागा शिवसेना लढणार आहे. त्या संकटात असताना त्या कुटुंबाला शिवसेनेनेच साथ दिली. अशा स्थितीत त्या कुटुंबाला इमान नसेल, निष्ठा नसेल तर बघू.(Mahavikas Aghadi-Lok Sabha Election 2024)

राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भात भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी, इंडिया आघाडी
आम्ही सगळे एक आहोत. राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. आज ते चांदवडमध्ये शेतकरी मेळावा घेत आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व घटक पक्ष मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. १७ तारखेला मुंबईत समारोप आहे.
शिवाजी पार्कवर स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. आज नाशिकमध्ये शिवसेना मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत
करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amit Shah On Uddhav Thackeray | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान, ”महाराष्ट्रासमोर CAA वर भूमिका स्पष्ट करा”

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल