×
Homeटेक्नोलाॅजी1 जानेवारीपासून महागणार UPI द्वारे ट्रांजेक्शन करणे, द्यावा लागेल Extra Charge

1 जानेवारीपासून महागणार UPI द्वारे ट्रांजेक्शन करणे, द्यावा लागेल Extra Charge

नवी दिल्ली : आगामी 1 जानेवारीपासून संपूर्ण देशात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface) द्वारे कुणालाही पेमेंट करणे महाग ठरणार आहे. यासाठी यूजर्सला अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल, जर कुणी व्यक्ती थर्ड पार्टी अ‍ॅप्स वापरत असेल.

एनपीसीआयने घेतला निर्णय
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने 1 जानेवारीपासून यूपीआय पेमेंट सर्व्हिसवर अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात एनपीसीआयने नव्या वर्षात थर्डपार्टी अ‍ॅपवर 30 टक्केचा कॅप लावला आहे. एनपीसीआयने हा निर्णय भविष्यात कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची मोनोपॉली रोखणे आणि त्यास साईजच्या हिशोबने मिळणार्‍या विशेष फायद्यापासून रोखण्यासाठी घेतला आहे.

या अ‍ॅप्सवर पेमेंट केल्यास होणार परिणाम
लोकांनी फोनपे, गुगलपे, अमेझॉन पे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्समधून पेमेंट केल्यास एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल. तर पेटीएम सारख्या अ‍ॅपवर एनपीसीआयने कॅपचा अतिरिक्त चार्ज लावलेला नाही.

मक्तेदारीची शक्यता होईल नष्ट
सरकारकडून सांगण्यात आले आहे की, देशात प्रत्येक महिन्याला सुमारे 200 कोटी युपीआय व्यवहार होत आहेत. हे युपीआय व्यवहार विविध पेमेंट अ‍ॅप्सच्या माध्यमातून होत आहेत. आगामी काळात देशात युपीआय व्यवहारांचा आकडा आणखी वाढेल. हा डिजिटल भारतच्या लक्ष्याचा चांगला संकेत आहे. परंतु, अशावेळी युपीआय व्यवहारांच्या प्रकरणात एकाच थर्ड पार्टी अ‍ॅपची मक्तेदारी होण्याची सुद्धा शक्यता आहे, जी यासाठी योग्य नाही.

Must Read
Related News