‘मुलीला कोणत्या झोपडपट्टीतून उचलून आणलंय?’, मंदिराच्या फोटोवर धक्कादायक कंमेंट्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेत्री मंदिरा बेदी सातत्याने सोशल मीडिया वर चर्चेत असते. नुकतीच ती पुन्हा एकदा चर्चेत अली आहे. मंदिराने आपल्या मुली बरोबरच एक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यामुळे तिला एका व्यक्तीच्या दुष्ट कंमेंट्स ला सामोरे जावे लागले.

मंदिराने आपली मुलगी तारा हिच्यासोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि त्यावर काही लोकांनी असभ्य भाषेत कमेंट्स करायला चालू केल्या. गेल्याच वर्षी मंदिराने आपली मुलगी तारा हिला दत्तक घेतलं आहे. तारा आता ४ वर्षांची आहे. तारासोबतच्या मंदिराच्या फोटोवर एकाने कमेंट केली की तुम्ही “तुमच्या मुलीला कोणत्या झोपडपट्टीतून आणलंय?” त्याला सडेतोड उत्तर देत मंदिरा म्हणाली, “तुमच्यासारख्या लोकांचा खास उल्लेख करायला हवा. तू माझं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलात, बिनकामाच्या माणसा!”

त्याच व्यक्तीने मंदिराला पर्सनल वर मेसेज करत म्हणाला, “रस्त्यावरुन घेतलेलं ते मूल तुमच्यापेक्षा फारच वेगळं दिसतंय. तुमच्यासारखे स्वार्थी लोक त्यांना झोपडपट्टीच्या आयुष्याची भीती घालत आहात.” यावर मंदिरा म्हणाली, “हेच ते सभ्य नागरिक. हे स्वतःला राजेश त्रिपाठी असं म्हणतात. हे नक्कीच त्यांचं खरं नाव नाही. कारण असे वेडे लोक सर्वात जास्त घाबरट असतात. त्यांना अनोळखी चेहऱ्यामागे राहून लोकांना वाईटसाईट बोलायची सवय असते.”